Mumbai Crime: मुंबईतील कुरार भागात महिला डॉक्टरला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी दुसऱ्या डॉक्टरवर गुन्हा दाखल केला आहे. मुंबईतील कुरार पोलीस ठाण्यात महिला डॉक्टरला मारहाण, शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली आहे. या संदर्भात पोलिसांनी डॉ. सुशांत कदम यांच्याविरुद्ध भादंवि कलम 509, 323, 504 आणि 506 अन्वये गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
कुरार पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी डॉक्टरने महिलेला तिच्या क्लिनिकबाहेर मारहाण, शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिली होती. महिला डॉक्टर म्हणाल्या, 24 डिसेंबर 2022 रोजी कामाच्या संदर्भात बीएमसी रुग्णालयात पोहोचले. तेव्हा सुशांत कदम हा आरोग्य डॉक्टर नसतानाही लोकांना लस देत होता. मी त्याला विचारले की, तुम्ही हेल्थ डॉक्टर नाही, मग लसीकरण का करत आहात, त्याने काहीच उत्तर दिले नाही. त्यानंतर मी तिथे बसलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार केली. (हेही वाचा -Sanjay Raut On Uorfi Jawed: महाराष्ट्राच्या राजकारणात उर्फी जावेदच्या कपड्यांशिवाय कोणताचं मुद्दा राहिला नाही: संजय राऊत यांचा सामनामधून भाजपवर निशाणा)
यावर सुशांतने संताप व्यक्त केला. आरोपी सुशांतने मला लोकांसमोर मारहाण, शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिली. तक्रार देण्यासाठी महिला पोलीस ठाण्यात गेली असता स्थानिक माजी नगरसेविकेने महिलेच्या पतीवर गुन्हा नोंदवू नये म्हणून दबाव टाकण्यास सुरुवात केली. त्यावेळी लेडी डॉक्टरने गुन्हा नोंदवला नाही. (हेही वाचा - Nitin Gadkari Threat Calls: नितीन गडकरींना कर्नाटक तुरुंगातून आले होते धमकीचे फोन; नागपूर पोलिसांचा खुलासा)
मात्र काही दिवसांनी आरोपी डॉक्टर सुशांतने पुन्हा तिला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली, त्यानंतर 13 जानेवारीला तिने आरोपी डॉक्टरविरुद्ध कुरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. कुरार पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. यापूर्वी अनेकदा शुल्लक कारणावरून डॉक्टरांवर हल्ला झाल्याच्या घटना घडल्या आहेत.