शिवजयंतीपूर्वीच राष्ट्रवादी पक्षाकडून भाजपवर फटकारे, व्यंगचित्रातून मोदी-शहांवर साधला निशाणा (फोटो सौजन्य-ट्वीटर)

आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) तारखा अद्याप स्पष्ट केल्या नाहीत. तरीही राजकीय पक्षांनी विरोध पक्षावर आरोपप्रत्यारोप करण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभुमीवर 19 फेब्रुवारी रोजी असणाऱ्या शिवजयंती निमित्त राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) भाजप (BJP) पक्षावर व्यंगचित्रातून फटकारे मारण्यात आले आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि अमित शहा (Amit  Shah) यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे.

राष्ट्रवादी यांनी ट्वीटरवर पोस्ट केलेल्या व्यंगचित्रात किल्ला दाखवण्यात आला असून नरेंद्र मोदी आणि अमित शहा एकमेकांशी बोलताना दाखवले आहेत. त्यावेळी मोदी अमित शहा यांना गेल्या वेळी छत्रपतींचा आशीर्वाद म्हणून मतं मिगतली असे विचारत आहेत. तर शहा मोदी यांना उलट प्रश्न विचारत आता काय करुयात असे विचारत असल्याचे फटकारे व्यंगचित्रातून देण्यात आले आहेत. तर जयंत पाटील यांनी त्यांच्या ट्वीटर अकाउंटवरुन हे ट्वीट केले आहे.(हेही वाचा-भाजप खासदाराचा पराक्रम: सामुदायिक विवाहसोहळ्यात लग्न झालेल्या जोडप्यांचे लग्न; अल्पवयीन मुलगाही चढला बोहल्यावर)

भाजप पक्षाने 2014 रोजीच्या निवडणुकीत सोशल मीडियाचा अत्यंत प्रभावीपणे उपयोग केला होता. तसेच सध्या भाजपवर सर्व पक्षांतून टीका केली जात आहे. त्यामुळे भाजप आता राष्ट्रवादीच्या या ट्वीटला काय उत्तर देतात हे पाहण्याजोगे आहे.