भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी राज्यपाल पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या जागी रमेश बैस (Ramesh Bais) यांची नियुक्ती नुकतीच झाली. बैस यांचा शपथविधी होणे अद्याप बाकी आहे. दरम्यान, भगत सिंह कोश्यारी यांना निरोप देण्याचे कार्यक्रम सध्या सुरु आहे. राजभवनातही अशाच प्रकारचा कार्यक्रम नुकताच पार पडला. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) सुद्धा कोश्यारी यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून हटके निरोप दिला आहे. महत्त्वाचे म्हणजे राज्यपाल कोश्यारी यांचे थेट नाव न घेता एक प्रगतीपुस्तक (Progress Book) ट्वटिरवरुन शेअर करण्यात आले आहे. ज्याला अधोगती पुस्तक असे म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ट्विटर हँडलवरुन कोश्यारी यांच्याबाबत एक प्रगती पुस्तक शेअर करण्यात आले आहे. ज्याला अधोगती असे म्हटले आहे. तसेच, कोश्यारी यांचा उल्लेख भगतसिंह श्यारी असा करण्यात आला आहे. त्यांचे एक गुणपत्रकही शेअर करण्यात आले आहे. या प्रगतीपुस्तकावर (अधोगती) भगतसिंह श्यारी यांची तुकडी 'ढ' असल्याचे म्हटले आहे. तर त्यांचा पटावरील हजेरी क्रमांक 42* असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या गुणपत्रावर गूण विषयानुरुप खालील प्रमाणे दिले आहेत.
इतिहास- 0
भूगोलात-35
नागरिक शास्त्रात- 17
सामान्य ज्ञान- 34
कला- 100
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भगतसिंह कोश्यारी यांना इतिहास विषयात 00 गुण देण्याला त्यांनी राज्यपाल पदावर असताना महापुरुषांवर केलेल्या वक्तव्याची किनार आहे. राज्यापलांन महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रिबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अतिशय अवमानकारक वक्तव्य केले होते. (हेही वाचा, Bhagat Singh Koshyari: शिंदे गटाला राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचा जाता जाता हळूच धक्का; काय घडलं नेमकं?)
ट्विट
जनहितार्थ जारी...@BSKoshyari @BJP4Maharashtra pic.twitter.com/kvb0uk6unQ
— NCP (@NCPspeaks) February 17, 2023
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कोश्यारी यांच्या प्रगतीपुस्तकावर शेराही लिहिला आहे. या शेऱ्यात म्हटले आहे की,
प्रति मुख्याध्यापक,
पत्रास कारण की, आमच्या शाळेतीर भगतसिंह श्यारी नामक विद्यार्थ्याला तत्काळ शाळेतून कमी करण्यात आले आहे. सदरहू विद्यार्थ्याबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्यामुळे तसेच विद्यार्थ्याने सुधारणेचे कोणतेही चिन्ह न दाखवल्याने अखेर त्यांची गच्छंती करण्यात येत आहे. सदरहू विद्यार्थ्याची बौद्धिक क्षमता अगदीच तोकडी असून, मनोंजनपर विषयात गती असली तरी बाकिच्या विषयांचा अभ्यास फार कच्चा आहे. आपली जबाबदारी ओळखण्याऐवजी इतर विद्यार्थ्यांविषयी चुकीची माहिती पसरविण्याचे काम विद्यार्थ्यांनी केले. तसेच खोडसाळपणा, नियमांचे उल्लंन, शाळेतील शांततेचा भंग करणे आण वाद निर्मण करणे अशी कृत्ये विद्यार्थी सातत्याने करत असतो. या वृत्तीमुले तुमच्या शाळेतील इतर विद्यार्थ्यांवरही संगतीचा वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सदर विद्यार्थ्यांस शाळेत प्रवेश देण्याचा विचार असल्यास वरील बाबींची नोंद घ्यावी ही विनंती
- आपला नम्र मुख्याध्यापक व्हॉट्सअॅप विद्यालय