Rohit Pawar On Competitive Examination Fees: राज्यात पावसाळी अधिवेशन (Mansoon Session)चालू आहे. अधिवेशनात विविध मुद्द्यांवर चर्चा पाहायला मिळत आहे. दरम्यान रोहित पवार (Rohit Pawar) यांनी चार दिवसांपुर्वी आंदोलन केले होतं. भरपावसात त्यांनी आंदोलन सुरु केल त्यांमुळे रोहित पवार पुन्हा चर्चेत आले. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी विधानसभेत स्पर्धा परिक्षा शुल्काच्या मुद्द्यावर चर्चा केली. सोशल मीडियावर हा विषय चर्चेचा ठरला आहे. राज्यभरात नोकऱ्यांचे प्रमाण कमी होत चालले आहे. शासकिय नोकऱ्यांची भरती जरी आली तरी त्यासाठी 1000 किंवा त्याहून अधिक रुपयांची फीस भरावी लागते.
स्पर्धा परीक्षांच्या शुल्काच्या (Competitive Examination Fees) माध्यमातून सरकार, परीक्षा घेणाऱ्या खासगी कंपन्या कमाई करत असल्याची चर्चा सुरू असते. UPSC कडून परीक्षा शुल्क म्हणून 100 रुपये, MPSC कडून 350 रुपये तर राजस्थान सरकार सगळ्या परिक्षांसाठी केवळ 600 रुपये आकारते. असे असताना राज्य सरकार केवळ तलाठी भरतीच्या एका परिक्षेसाठी नऊशे- हजार रुपये शुल्क का आकारते. खासगी कंपन्यांचे खिशे का भरले जातात? सामन्यांचे प्रश्न सुटत नसतील तर आमदार होऊन करायचं काय? असा मुद्दा आमदार रोहित पवार यांनी विधानसभे समोर मांडला.
#UPSC कडून परीक्षा शुल्क म्हणून १०० रुपये, #MPSC कडून ३५० रुपये तर राजस्थान सरकार सगळ्या परिक्षांसाठी केवळ ६०० रुपये आकारते.. असे असताना राज्य सरकार केवळ तलाठी भरतीच्या एका परिक्षेसाठी नऊशे- हजार रुपये शुल्क का आकारते. खासगी कंपन्यांचे खिशे का भरले जातात? सामन्यांचे प्रश्न सुटत… pic.twitter.com/3TrRmMSSx2
— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 26, 2023
सोशल मीडियावर या विषयी चर्चा रंगली आहे. स्पर्धा परिक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या व्हिडिओवर चांगला प्रतिसाद दिला आहे. 25 जुलै रोजी रोहित पवारांनी याच मुद्द्यावर चर्चा केली होती. नुकतीच तलाठी पदासाठी अर्ज मागवण्यात आले होतं. खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये तर राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये एवढे परीक्षा शुल्क आकारण्यात आले आहे. महिन्याभरातंच शासनाकडे 12 लाख 77 हजार 100 अर्ज आले आहेत. ज्याची एकूण शुल्क रक्कम तब्बल 127 कोटी रुपये हे शासकीय खात्यात जमा झाले. असा अहवाल देखील वृत्तात छापून आला होता.