पुणे येथे राज्य आणि देशभरातील विद्यार्थी शिक्षणासाठी दाखल होता. यातील अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षा करणारी असतात. या विद्यार्थ्यांचे प्रश्न मोठ्या प्रमाणावर आहेत. दरम्यान, हे विद्यार्थी मिळेल त्या स्थितीत, परिस्थितीत अभ्यास करतात. मात्र, अनेकदा या विद्यार्थ्यांसोबत उद्धट वर्तन केले जाते. पुणे शहरातील ओंगारेश्वर मंदिर परिसरात अशीच घटना घडली. मंदिर परिसरात असलेल्या शांततेत काही MPSC, UPSC विद्यार्थी अभ्यास करत बसले होते. दरम्यान, काही लोक तिथे आले आणि त्यांनी इथे का बसलात म्हणून हटकण्यास सुरुवात केली. यातील काही लोकांनी मुलांना शिवीगाळ केल्याचेही समजते. शिवीगाळ करणारे लोक मंदिर परीसराशी संबंधित असल्याचे बोलले जात आहे. लेटेस्टली मराठी या व्हिडिओची पुष्टी करत नाही.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)