Bharat Bhalke (Photo Credit: Twitter)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार भारत भालके (Bharat Bhalke) यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्यावर पुण्यातील रूबी हॉल रुग्णालयात उपचार सुरु आहेत. भारत भालके हे गेल्या काहीच दिवसांपूर्वी कोरोनावर मात करून घरी परतले होते. मात्र, पुन्हा एकदा अस्वस्थ जाणवू लागल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करणयात आले होते. तिथे त्यांना पोस्ट कोव्हिड झाल्याचे निदान झाले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी रुग्णालयाकडून भालके यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे.

भारत भालके यांना 30 ऑक्टोबर रोजी कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यानंतर भालके यांनी कोरोनावर मात करून स्वगृही देखील परतले होते. मात्र, पुन्हा एकदा अस्वस्थ जाणवू लागल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे गेल्यावर त्यांना पोस्ट कोव्हिड झाला असल्याच निदान डॉक्टरांनी केले आहे. भालके याना मधुमेह व रक्तदाबाचा त्रास असल्याने त्यांच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त केली जात आहेत. भालके यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती शुक्रवार सकाळपासून पंढरपूरात पसरली होती. या माहितीस अधिकृत दुजोरा दुपारनंतर पुणे येथे रुबी हॉस्पिटलने जारी केलेल्या मेडिकल बुलेटीनमधून मिळाला आहे. हे देखील वाचा- Supriya Sule: 'ठाकरे सरकार पडणार' असे बोलणाऱ्या नेत्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी फटकारले

ट्विट-

भारत भालके हे थेट जनमानसात रमणारे आणि एकदम बेधडक आमदार म्हणून त्यांची ओळख आहे. भारत भालके हे पंढरपूर- मंगळवेढा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस आमदार आहेत. भारत भालके यांनी 2019 मध्ये काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन, भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, ऐनवेळी निर्णय बदलून ते राष्ट्रवादीत दाखल झाले. भारत भालकेसुद्धा भाजप प्रवेशासाठी मुंबईत तळ ठोकून होते. भारत भालकेंच्या प्रवेशाला भाजपमधील परिचारक गटाने मोठा विरोध केला होता.