शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या वक्तव्यामुळे सुरू झालेल्या वादात आता राष्ट्रवादी पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी उडी घेतली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या विश्वासाहर्तेबद्दल अमेरिकेने प्रश्नचिन्ह निर्माण करुन संबंधही तोडून टाकले. अनेक प्रख्यात-डॉक्टरांनी, राष्ट्रांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या कारभाराविषयी शंका-कुशंका व्यक्त केल्या. या विषयावर कोणीही बोलताना दिसलेले नाही. मात्र, संजय राऊत बोलले आणि वादळच आले, अशा आशयाचे ट्वीट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. राऊत यांनी एबीपी माझावरील कार्यक्रमात बोलताना मी कधीही डॉक्टरकडून औषध घेत नाही कंपाऊंडरकडून घेतो, त्याला जास्त कळते, असे विधान केले होते. त्यानंतर त्यांच्याविरोधात नाराजी व्यक्त केली जात आहे.
“कंपाऊंडर काही टाकाऊ नसतात. उलट माझे कौतुक केले पाहिजे. डॉक्टरांनी आपला कंपाऊंडरही ताकदीचा निर्माण केला आहे. हे कौतुकास्पद आहे. हे जगात कुठे नाही तर, भारतातच आहे. कंपाऊंडरचा सन्मान केला म्हणून इतके टोकाची भूमिका घेण्याची गरज नाही. जर कोणाचा गैरसमज झाला असेल तर तो दूर करावा. मी त्यांच्याशी बोलायला तयार आहे. माफी मागण्याआधी मी काय बोललो ते समजून घ्या. मी अपमानच केलेला नाही. माझी भूमिका जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रश्नावर होती. बोलण्याच्या ओघात एक शब्द येतो आणि त्यावर अशा पद्धतीने राजकारण होत आहे. हे होऊ नये असे मला वाटते,” असे संजय राऊत यांनी म्हटले आहेत. हे देखील वाचा- शरद पवार यांना कोरोना म्हणणाऱ्या गोपीचंद पडळकर यांना भाजपचे बक्षीस, पक्ष प्रवक्ते म्हणून झळकणार
जितेंद्र आव्हाड यांचे ट्वीट-
जागतिक आरोग्य संघटनेच्या विश्वासाहर्तेबद्दल अमेरिकेने प्रश्नचिन्ह निर्माण केले संबंधही तोडून टाकले. अनेक प्रख्यात-डॉक्टरांनी, राष्ट्रांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या कारभाराविषयी शंका-कुशंका व्यक्त केल्या. ह्या विषयावर कोणिही बोलताना दिसलेले नाही.@rautsanjay61 बोलले आणि वादळच आले
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) August 17, 2020
तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लंडनमध्ये जाऊन डॉक्टरांचा अपमान केला. तेव्हा विरोध करणाऱ्या संघटना कुठे होत्या, अशी विचारणा संजय राऊत यांनी केली आहे. "मला कोणीतरी क्लिप पाठवली. नरेंद्र मोदींनी लंडनला जाऊन डॉक्टरांचा अपमान केला होता. आमच्याकडील डॉक्टर कसे व्यापारी आहेत आणि त्यांना रुग्णसेवेत रस नसून औषधे विकण्यात आणि पैसै कमावण्यात कसा रस आहे. यासंबंधी हे विधान आहे. लंडन येथील डॉक्टरांनी त्यांचा निषेध केला होता, येथील नाही. त्यावेळी येथील संघटनांनी आक्षेप घेतला नाही, असेही संजय राऊत म्हणाले होते.