महात्मा फुले जयंती दिवशी 'ज्ञानाचा दिवा' लावा: शरद पावर
Sharad Pawar | (Photo Credits: Faceboo

पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत घरातील लाईट बंद करुन देशभरातील अनेक नागरिकांनी घरोघरी अंधारात दिवे लावले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनीही दिवे लावण्याचे आवाहन जनतेला केले आहे. मात्र, पवारांनी घरातील नव्हे तर ज्ञानाचे दिवे लावण्याचे आवाहन केले आहे. येत्या 11 एप्रिल रोजी असलेल्या महात्मा फुले जयंती  (Mahatma Phule Birth Anniversary) दिनाचे स्मरण देत शरद पवार यांनी 'ज्ञानाचा दिवा लावूयात' (Lamp Of Knowledge) असं आवाहन केलं शरद पवार (Sharad Pawar) यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला या वेळी ते बोलत होते. या वेळी बोलताना शरद पवार यांनी विविध विषयांवर भाष्य केले.

फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून बोलताना शरद पवार म्हणाले की, 'महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी आपल्याला ज्ञानाचा, एकतेचा संदेश दिला. त्यामुळे एक दिवा ज्ञानाचा असा संदेश देण्यासाठी हा दिवस योग्य आहे'. दरम्यान, येत्या 14 तारखेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. ही जयंती 'एक दिवा संविधानाचा' लावून साजरी करुया असेही पवार म्हणाले. दरम्यान, या वेळी कोणत्याही प्रकारची गर्दी टाळावी असे आवाहनही पवार यांनी केले. (शरद पवार यांच्या फेसबुक लाईव्हमधील अधि मुद्दे जाणून घेण्यासाठी हे वृत्त वाचा)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात कधीही अंधश्रद्धेला समर्थन दिले नाही. त्यामुळे अंधश्रद्धेचं समर्थन करु नका. व्यक्तिने चिकित्सक असायला हवे, अशी भावानाही शरद पवार यांनी व्यक्त केली. दरम्यान, शब्ब-ए-बारातसाठी घराबाहेर पडू नका असे आवाहनही शरद पवार यांनी मुस्लिम बांधवांना केले.