बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) मृत्यू प्रकरणाचा तपास ड्रग्स एंगलने सुरु झाल्यानंतर मुंबईत (Mumbai) ड्रग्सच्या पुरवठ्याविरुद्ध नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो (Narcotics Control Bureau) अधिक सतर्क झाली असून सातत्याने कारवाई सुरु आहे. दरम्यान, ड्रग्स प्रकरणाची व्याप्ती मोठ्या प्रमाणावर वाढली असल्याचे निर्दशनास आले आहे. एनसीबीच्या तपास यंत्रणेत आणखी एका ड्रग रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. मुंबईतील अंधेरी (Andheri), जुहू (Juhu) भागात ड्रग्सचे हे नेटवर्क पसरले होते. अब्दुल वाहिद (Abdul Wahid) हा या टोळीचा लीडर असून NCB ने त्याला अटक केली आहे.
एनसीबीने दिलेल्या माहितीनुसार, अब्दुल स्वतःला डॉन समजतो. त्याने स्वत:चे नाव बदलून सुलतान मिर्झा ठेवले आहे. हाजी मस्तानवरील चित्रपटात अभिनेता अजय देवगनने सुलतान मिर्झाची व्यक्तिरेखा साकारली होती. त्यावरुन हे नाव ठेवण्यात आले आहे. एनसीबीने वाहिदची गाडीही ताब्यात घेतली असून गाडीतून एमडी, चरस सह तब्बल 32 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. (Drugs Racket चालविणारे 14 नायजेरियन तरुण पोलिसांकडून गजाआड)
सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या ड्रग्सच्या अनुषंगाने होत असलेल्या तपासात बॉलिवूडमधील अनेक बड्या सेलिब्रिटींची नावे समोर आली. दरम्यान, एनसीबीने दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान, रकुल प्रीत सिंह यांसारख्या अभिनेत्रींची चौकशी केली आहे. सध्या दीपिकाची मॅनेजर करिश्मा प्रकाश हिची कसून चौकशी करण्यात येत आहे. (Bollywood Drugs Case: दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर आणि सारा अली खान समवेत 'या' व्यक्तींचे मोबाईल फोन्स NCB ने केले जप्त)
दरम्यान, नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने क्षितीज प्रसाद यांना पुन्हा एकदा अटक केली आहे. त्याच्यासोबत एजिसियालोस नामक व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नायजेरियन ड्रग्स सिंडिकेटशी संबंधित एका प्रकरणात दोघांनाही अटक करण्यात आली आहे. आरोपींच्या चौकशीदरम्यान दोघांची नावे पुढे आली होती. क्षितीज, करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनमध्ये मॅनेजिंग प्रोड्युसर म्हणून काम करतो. यापूर्वी त्याला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली होती. एजिसियालोस हा अभिनेता अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड गॅब्रिएलाचा भाऊ आहे.