सातारा ईव्हीएम प्रकरण; राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दीपक पवार यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल
EVM (Photo Credit - File Photo)

सोमवारी राज्यात विधानसभा निवडणुकीबरोबरच (Maharashtra Assembly Election 2019) सातारा मतदारसंघासाठी पोटनिवडणुकीची प्रक्रिया पार पडली. दरम्यान साताऱ्यातील कोरेगाव लोकसभा मतदारसंघातील नवलेवाडी (Navlewadi) गावातील मतदान केंद्रावरील ईव्हीएममध्ये घोळ (Technical Fault in EVM) असल्याचे वृत्त तेथील ग्रामस्थांनी दिले होते. त्यावरून प्रसारमाध्यमांनी या केंद्रावरील ईव्हीएमवरील कोणतेही बटण दाबले तरी मत ‘कमळ’ या चिन्हालाच जात असल्याचे वृत्त प्रसिद्ध केले होते. याप्रकरणी खोटी माहिती प्रसारमाध्यमांना दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रतिनिधी दीपक पवार यांच्याविरोधात पुसेगाव पोलीस ठाण्यात अखदलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवलेवाडी मतदान केंद्राचे अध्यक्ष गुलाब गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीनंतर पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा - Maharashtra Assembly Election 2019: ईव्हीएमवरील कोणतंही बटण दाबलं तरी मत कमळालाच! साताऱ्यातील नवलेवाडी गावातील धक्कादायक प्रकार

राष्ट्रवादीचे दिपक पवार आणि आमदार शशिकांत शिंदें यांच्यासह अनेकांनी नवलेवाडी येथील ईव्हीएममध्ये घोळ असल्याचा आक्षेप केला होता. त्यामुळे मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांनी ईव्हीएम सील करत दुसऱ्या ईव्हीएम मशीनद्वारे मतदानाची प्रक्रिया पार पाडली होती. मात्र, या सर्व गोंधळाची निवडणूक अधिकाऱ्यांनी याची तपासणी केली. त्यानंतर यामध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पवार यांच्यावर अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा - Maharashtra Assembly Polls: या 3 निवडणुकीत चुकला होता एक्झिट पोलचा अंदाज, जाणून घ्या सविस्तर माहिती 

दरम्यान, नवलेवाडी येथील निवडणूक केंद्रावरील ईव्हीएममध्ये घोळ असल्याच्या वृत्तामध्ये कोणतेही तथ्य नाही, असे कोरेगाव विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कीर्ती नलावडे यांनी स्पष्ट केलं आहे.