Nawab Malik On BJP: गुजरात ड्रग्ज रॅकेटचं केंद्र बनू लागलंय का? नवाब मलिक यांचा भाजपवर पुन्हा निशाणा
Nawab Malik | (Photo Credits: Facebook)

महाविकासआघाडी सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी पुन्हा एकदा भाजपवर (BJP) जोरदार निशाणा साधला आहे. गुजरात (Gujarat) हे ड्रग्ज रॅकेटचे (Drug Racket) केंद्र बनू लागले आहे काय? ड्रग्जचा खेळ गुजरातमधून चालतोय का? असा थेट सवाल नवाब मलिक यांनी उपस्थित केला आहे. ते आयोजित पत्रकाकर परिषदेत बोलत होते. गुजरात राज्यातील द्वारका येथे तब्बल 350 कोटी रुपयांचे ड्रग्ज सापडले. या मुद्द्यावरुन आता वातावरण जोरदार तापत आहे. आगोदर शिवसेना नेते संजय राऊत आणि याता नवाब मलिक यांनी याच मुद्द्यावरुन भाजपवर निशाणा साधला आहे.

नवाब मलिक यांनी गुजरात सरकारमधील एका मंत्र्याचे नाव घेत टीकास्त्र सोडले. काही दिवसांपूर्वी मुंद्रा बंदरावर मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज सापडलं. आताहदी द्वारका येथे 350 कोटी रुपयांचे ड्रग्ज सापडले. याला योगायोग म्हणायचे काय? मनीष भानुशाली, धवल भानुशाली, किरण गोसावी, सुनील पाटील हे लोक वारंवार गुजरातला जाऊन अहमदाबाद येथे नोवाटेल आणि फाईव्ह स्टार हॉलेटलमध्ये राहिले आहेत. तसेच, या लोकांचे गुजरात सरकारमधील मंत्री किरीटसिंह राणा यांच्याशी अगदी जवळचे संबंध राहिले आहेत. महत्वाचे म्हणजे हे लोक ड्रग्ज प्रकरणांमध्ये पुढे आले आहे. त्यामुळे गुजरातमधून तर ड्रग्जचा खेळ चालत नाही ना? असा सवाल मलिक यांनी उपस्थित केला आहे. (हेही वाचा, Nawab Malik On Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात बनावट नोटांचा धंदा; नवाब मलिक यांचा खळबळजनक आरोप)

नवाब मलिक यांनी शंका उपस्थित केली की, महाराष्ट्रात दोन, तीन गॅमची कारवाई करावी. त्यात सेलिब्रेटींची परेड करावी. त्यातून लोकांचे लक्ष विचलीत करावे आणि त्या आढून गुजरातमधून ड्रग्ज रॅकेट चालवावं असं नियोजन आहे का? अशी शंका लोकांच्या मनात निर्माण होत आहे, असा घणाघात मलिक यांनी केला. मुंद्रा पोर्टचा तुपाससुरु आहे. द्वारका येथे सापडलेल्या साडेतीनशे कोटी रुपयांच्या ड्रग्ज प्रकरणाचीही सखोल चौकशी करावी. या प्रकरणात कोणता नेता आहे, तो कोणत्या पक्षाशी संबंधित आहे हे न पाहता एनआयए आणि एनसीबीचे विभागीय संचालक किंवा एनसीबीचे डीजी योग्य पद्धतीने तपास करावा, अशी मागणीही नवाब मलिक यांनी या वेळी केली.