Nawab Malik on Samir Wankhede: मुंबईतील क्रुज वरील ड्रग्ज प्रकरणातील वाद आता भाजप विरुद्ध महाराष्ट्र सरकारमध्ये सुरु झाला आहे. महाराष्ट्र सरकार मधील मंत्री नवाब मलिक यांनी मंगळवारी पुन्हा एकदा भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. त्यांनी असे म्हटले की, फडणवीस यांनी आरोप लावत म्हटले माझ्या जावयाच्या घरातून गांजा जप्त केला गेला. पण सत्य असे आहे की, जावयाच्या घरात काहीच मिळाले नाही. ऐवढेच जर वाटत असेल तर तुमचे निकटवर्तीय वाखेडे यांच्याकडून पंचनामा मागवून घ्या.
त्याचसोबत समीर वानखेडे यांच्यावर हल्लाबोल करत मलिक यांनी म्हटले की, तो जेव्हा पासून एनसीबीच्या डिपार्टमेंट मध्ये आला आहे तेव्हा त्याने एक खासगी सैन्य तयार केले आहे. यामध्ये मनीष भानुशाली, सॅम डिसूजासह काही लोकांचा समावेश आहे. ते ड्रग्जचा धंदा करतात आणि लोकांना फसवतात. मी सातत्याने सांगत आहे की, वानखेडे यांच्या माध्यमातून करोडो रुपयांची वसूली केली गेली आहे. जो प्रभाकर सईल याने म्हटले की, 18 कोटी रुपयांची डील होती ती गोष्ट आता सॅम डिसूजाने मान्य केली आहे. आता तो समोर आला आहे. सॅम असे म्हणत आहे की, यामध्ये एनसीबीचा समावेश नाही आहे. आम्ही फोटो पाहिले की, किरण गोसावी मागे उभा आहे. वानखेडे हा पूर्णपणे बनावटपणा रचत होता. प्रत्येक वेळेस सत्यमेव जयते बोलून पळून जाऊ नये.(Chandrakant Patil on Nawab Malik: नवाब मलिक यांना परिणाम भोगावे लागणार', देवेंद्र फडणवीस यांच्यावरील आरोपानंतर चंद्रकांत पाटील आक्रमक)
Tweet:
The private Army carries on the business of drugs in this city, small cases are highlighted, people are framed and big cases go on unhindered: Maharashtra Minister Nawab Malik
— ANI (@ANI) November 2, 2021
मलिक यांनी म्हटले की, मी जे काही आरोप लावले आहेत ते हवेतील नाहीत. ड्रग्ज पॅडलर फिनामस हा प्रमुख होता. पुढे असे म्हटले की, देवेंद्र फडवणीस यांनी आरोप लावले आणि मी आरोप लावल्यानंतर माफी मागत नाही असे सु्द्धा त्यांनी म्हटले. फडवणीस यांनी म्हटले की, मलिक यांच्या जावयाच्या घरातून गांजा जप्त केला गेला. पण वानखेडे कडून तुम्ही याबद्दल पंचनामा मागवावा असा पलटवार मलिक यांनी फडणवीस यांच्यावर केला आहे. जेव्हा माझ्या जावयाच्या घरावर छापेमारी केली गेली तेव्हा मीडिया तेच दाखवत होते. मीडियाच्या लोकांची दिशाभूल केली गेली.
एनसीपी नेत्याने म्हटले की, फडणवीस हे चार्जशीट कमकुवत करण्यासाठी मी आरोप लावत असल्याचे बोलत आहेत. फडणवीस हे वकील आहेत. त्यांना माहिती असले पाहिजे, NDPS मध्ये 6 महिन्यात चार्जशीट तयार करायची असते. या प्रकरणी चार्जशीट फाइल झाली आहे. आता तुम्ही माफी मागणार का? असा सवाल मलिक यांनी उपस्थितीत केला आहे. फडणवीस यांनी म्हटले की, गेल्या सरकारच्या काळात मला राजीनामा द्यावा लागला होता आणि हे खरं आहे. तेव्हा सुद्धा आयोगाच्या समोर मी म्हटले होते की, एकच नव्हे तर 10 लोकांच्या हितासाठी मी राजीनामा द्यायला तयार आहे.