Chandrakant Patil on Nawab Malik: नवाब मलिक यांना परिणाम भोगावे लागणार', देवेंद्र फडणवीस यांच्यावरील आरोपानंतर चंद्रकांत पाटील आक्रमक
Devendra Fadnavis, Nawab Malik | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Chandrakant Patil) यांच्यावर केलेल्या आरोपानंतर महाराष्ट्र भाजप (BJP) जोरदार आक्रमक झाली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी 'ड्रग्र प्रकरणातील वादात देवेंद्र फडणवीस यांना ओढल्याचे परिणाम नवाब मलिक यांना भोगावे लागतील' असे म्हटले आहे. प्रविण दरेकर यांनीही नवाब मलिक यांच्यावर टीका केली आहे.

चंद्रकांत पाटील यांनी नवाब मलिक यांच्या आरोपांवर बोलताना म्हटले आहे की, पाठिमागील काही दिवसांपासून नवाब मलिक हे बेछुट आरोप करत आहेत. शिवसेनेचे संजय राऊत कमी पडत होते म्हणून नवाब मलिक यांना जोडले आहे का? असा सवाल उपस्थित करत चंद्रकात पाटील यांनी म्हटले आहे की, नवाब मलिक यांनी पुराव्यांशिवाय बोलू नये. पुराव्यांशिवाय बोलल्यांची अवस्था फार वाईट होते. देवेंद्र फडणवीस यांना वादात ओढण्याचे परिणाम भोगावे नवाब मलिक यांना लागतील. राज्यात आज अनेक प्रश्न आहेत. अतिवृष्टीने ग्रस्त शेतकऱ्यांना अद्यापही मदत मिळाली नाही. एसटी कर्मचारी गळफास घेत आहेत. त्यामुळे ते संपावर जात आहेत. या प्रश्नांवरुन लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी हे आरोप केले जात असल्याचेही चंद्रकांत पाटील म्हणाले. (हेही वाचा, Nawab Malik on Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस यांच्यावरील नवाब मलिक यांच्या आरोपानंतर भाजपमध्ये खळबळ, बचावासाठी महाराष्ट्रातील नेते मैदानात)

नवाब मलिक यांनी अनिल देशमुख यांची काळजी करण्याऐवजी ते समिर वानखेडे यांची काळजी करत आहेत. समाज वानखेडे यांच्या बाजूने आहे. आम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सरकारकडे नाहीत म्हणूनच बेछुट आरोप केले जात असल्याचे पाटील यांनी म्हटले. पुढे बोलताना नीरज गुंडे हा सामाजिक कार्यकर्ता आहे. त्याच्याविरुद्ध जर काही पुरावे असतील तर जरुर चौकसी करा. सरकार स्थापन होऊन 19 महिने झाले. तुम्ही आमचे काही वाकडे करु शकला नाही, असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी मलिकांवर निशाणा साधला आहे.