Nawab Malik On MVA Govt: सरकारच्या दोन वर्षाच्या कारभाराबाबत जनता समाधानी, महाराष्ट्राने प्रत्येक संकटावर यशस्वीपणे मात केली - नवाब मलिक
Nawab Malik | ( Photo Credits: ANI))

राज्यात नव्या राजकीय समीकरणासह स्थापन झालेल्या महाविकास आघाडी (MVA) सरकारच्या कार्यकाळाला दोन वर्ष पूर्ण झाली. तसेच राज्य सरकारने उत्तम प्रकारे या दोन वर्षात काम केले आहे, असे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी पत्रकार  परिषदेत (Press Conference) म्हटले आहे. किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर नवा प्रयोग करून आघाडी सरकार स्थापन झाले. राज्यातील जनतेला न्याय देणे, सगळ्यांना पुढे जाण्यासाठी काम करण्यावर सरकारने भर दिला. नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्ती निर्माण होऊनही राज्य सरकारने परिस्थिती योग्य प्रकारे हाताळली. राज्य सरकारने काटकसरीचे धोरण अवलंबले असल्याने सरकारच्या यशस्वी वाटचालीबाबत मोठा गाजावाजा करण्यात येणार नसल्याचे नवाब मलिक यांनी  म्हटले आहे.

Tweet

महाराष्ट्रात आम्ही 2 वर्षांचा कारभार पूर्ण केला आहे. आमचे पहिले धोरण म्हणजे की शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज 2 महिन्यांत माफ करणे हे होते. महाविकास आघाडी सरकार स्थापन होऊन तीन महिने पूर्ण होत नाही तोच कोविडचे संकट उभे ठाकले. कोविडमुळे 66.50 लाखांहून अधिक नागरिक बाधित झाले, दरम्यान महाराष्ट्राला सर्वात जास्त फटका बसला, तरीही आम्ही इतर राज्यांपेक्षा चांगले काम केले, बेड किंवा ऑक्सिजनच्या अनुपलब्धतेच्या तक्रारींसह आम्ही नागरिकांना योग्य नियोजन करुन दिले. कोविड-19 मुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना 50,000 रुपये मदत आम्ही करत आहोत असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे. (हे ही वाचा 2 Years of Maha Vikas Aghadi: महाविकास आघाडी सरकारची दोन वर्षपूर्ती; 'गंभीर संकटातही खंबीर महाराष्ट्राची परंपरा सरकारने कायम राखली'- उपमुख्यमंत्री अजित पवार.)

भाजप आता हतबल झालंय,दोन वर्षांनंतरही सरकार पाडता आलं नाही, आमदार खरेदीचा कार्यक्रमही इथे करता आला नाही, असा टोला राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.  भाजपमधील नाराज नेते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे त्यांनी म्हटले. आता भाजपा सत्तेपासून दूर आहेत. विरोधीपक्ष म्हणूनही त्यांची कामगिरी समाधानकारक नाही. उत्तर प्रदेशात काम होवो अथवा न होवो, जाहिरातबाजी मात्र महाराष्ट्रात होते, असा आरोप त्यांनी केला.