Navratri 2023:भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केलेल्या मागणीमुळे नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. नवरात्रोत्सवात (Navaratri) खेळल्या जाणाऱ्या गरबा आणि दांडियामध्ये (Dandia) केवळ हिंदूंनाच परवानगी देण्यात यावी. त्यासाठी आयोजकांनी यामध्ये सहभागी होणाऱ्या मंडळींचे आधारकार्ड तपासावे, मगच त्यांना परवानगी द्यावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे. .नवरात्र सुरू होईल आणि दांडिया खेळला जावा, ही समस्त हिंदू समाजाची मागणी आहे, त्यात सहभागी होणारे लोक हिंदू समाजाचे असावेत, अशी मागणी समाजातून होत असल्याचेही ते म्हणाले.
समाजात घडत असलेल्या 'लव्ह जिहाद' (Love Jihad) आणि 'धार्मिक धर्मांतरा'च्या घटनांची विस्तृत माहिती आम्हाला मिळाली आहे. अनेक प्रकरणांमध्ये हिंदू महिलांना खोटे बोलून आमिष दाखवले जाते.आमच्या (हिंदू) समाजाचे नसलेले लोक भगवे उपरणे व इतर पोशाख घालून अशा कार्यक्रमांना येतात आणि स्वतःला हिंदू म्हणवतात. म्हणून आम्ही आयोजकांना विनंती केली आहे की, प्रवेशद्वारावर येणाऱ्या प्रत्येकाचे आधार कार्ड तपासा आणि फक्त हिंदूंनाच परवानगी द्या, हिंदू महिलांना कोणतीही अडचण येणार नाही.
दुर्गादेवी उत्सव म्हणून नवरात्री साजरी केली जाते. यंदाच्या वर्षी नवरात्री 15 ते 24 ऑक्टोबर या काळात साजरी होत आहे. देशभरात विविध राज्ये, राज्यांतील समूह प्रथा, परंपरेने नवरात्रोत्सव साजरा करतात. हा काळा अनेकांच्या जीवनात आनंद घेऊन येतो. नवरात्रोत्सव तोंडावर आला असला तरी त्याला आणखी काही दिवस बाकी आहेत. त्यामुळे दुर्गादेवीचे भक्त हा भव्य उत्सव साजरा करण्यासाठी वाट पाहत आहेत. नवरात्रोत्सव काळात ते प्रार्थना करतात, नऊ दिवस उपवास करतात आणि नवरात्रीला त्यांच्या प्रियजनांसोबत आपले क्षण आनंदाने साजरे करतात. प्रत्येकजण हा सण आपल्या मित्रपरिवारासाठी अविस्मरणीय करण्याचा प्रयत्न करतो.
व्हिडिओ
#WATCH | Maharashtra | BJP MLA Nitesh Rane says, "...It is the demand of the entire Hindu community that when Navaratri begin and dandia will be played, participants should be from the Hindu community. We have received extensive information that cases of 'Love Jihad' and… pic.twitter.com/HNGFm05NO9
— ANI (@ANI) October 10, 2023
नवरात्रीच्या नऊ दिवशी दुर्गादेवीच्या वेगवेगळ्या रुपांमध्ये तीची पूजा केली जाते. तिचा आशीर्वाद घेतला जातो. नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी, भारतीय लोक दसरा साजरा करतात. नवरात्रीचा सण म्हणजे सर्वत्र उत्साह आणि आनंद असतो. लोक त्यांच्या कुटुंबासाठी या उत्सवात वेगवेगळ्या पाककृती वापरण्याचा आनंद घेतात. महिला नवनव्या साड्या परीधान करतात. या काळात गरबा, दांडीया खेळला जातो. यासाठी अनेक लोक आगोदरपासूनच तयारी सुरु करतात. तरुण-तरुणींसाठी हा काळा अतिशय महत्त्वाचा आणि उर्जात्मक मानला जातो. अलिकडील काळात या उत्सवांना धार्मिक उन्मादाची किनार लाभल्याने तसेच काही कट्टरतावादी मंडळींनी अधिक आक्रमक आणि कट्टर भूमिका घेतल्याने हा उत्सव कप्पेबंद होऊ लागला आहे.