नवरात्रीच्या (Navratri 2019) निमित्ताने उद्या (29 सप्टेंबर) पासून ते दसऱ्या पर्यंत (8 ऑक्टोबर ) ठिकठिकाणी सार्वजनिक उत्सव मंडळांचे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. मुंबई व उपनगर तसेच ठाणे (Thane) शहरात या नऊ दिवसात गरबा दांडियाचा (Dandiya -Garba0 जबरदस्त उत्साह पाहायला मिळतो. याच पार्श्वभूमीवर ठाणे शहरात वाहतूक व्यवस्थापनासाठी काही मार्गात बदल करण्यात आले आहेत. ठाण्यात प्रामुख्याने टेंभीनाका (Tembhi Naka) परिसरात 'दुर्गेश्वरी' (Durgedurgeshwari) देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविक खास हजेरी लावतात.ही बाब लक्षात घेत संबंधित परिसरात वाहनांची प्रवेश बंदी व पर्यायी मार्ग दर्शवणारे एक सूचना पत्रक नुकतेच ठाणे वाहतूक पोलिसांनी (Thane Traffic Police) ट्विटर वरून शेअर केले आहे.
वाहतूक पोलिसांच्या माहितीनुसार यापुढील नऊ दिवस ठाणे स्टेशन कडून सिव्हिल हॉस्पिटल येथे जाण्यासाठी टॉवर नाका येथे प्रवेश बंद असेल तर या ऐवजी आपण वाहने गडकरी सर्कल- दगडी शाळा चौक-अल्मेडा सर्कल अशी वळवू शकता. तर गडकरी सर्कल येथून टॉवर नाका येथे जाण्यासाठी वसंत हॉटेल येथे प्रवेश निषिद्ध आहे, त्याऐवजी गडकरी सर्कल - दगडी शाळा चौक मार्गाचा वापर करता येईल. याशिवाय टेंभी नाक्याकडे जाताना धोबी आळी क्रॉस व कलेक्टर ऑफिस बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या परिसरात प्रवेश करता येणार नाही, याऐवजी संबंधित परिसरतेवून पर्यायी मार्गाची सोय करण्यात आली आहे.
ठाणे वाहतूक पोलीस ट्विट
'
ठाणे शहरात नवरात्रोस्तवानिमित्त दि.२९/०९/२०१९ ते दि.०८/१०/२०१९ या कालावधीत करण्यात आलेली वाहतूक व्यवस्था.१/२ #नवरात्रोस्तव२०१९ pic.twitter.com/VhXiE33hAM
— Thane City Police (@ThaneCityPolice) September 28, 2019
दरम्यान, वाहतूक व्यवस्थेत करण्यात आलेले बदल हे खाजगी व टीएमटी व एसटी बस अशा सरकारी वाहनांसाठी सुद्धा समान असतील. नवरात्रीच्या नऊ दिवसांनंतर या ठिकाणची वाहतूक पुर्वव्रत करण्यात येईल मात्र तोपर्यंत पोलिसांनी या सुधारित व्यवस्थेनुसार नागरिकांना आपल्या प्रवासाचे नियोजन करण्याची सूचना केली आहे.