Navneet Rana यांचं अंडरवर्ल्ड कनेक्शन, Yusuf Lakdawala कडून 80 लाख घेतल्याचा  संजय राऊतांचा दावा
Sanjay Raut | (Photo Credits: Facebook)

शिवसेना आणि राणा दाम्पत्यांमध्ये मागील काही दिवसांमध्ये संघर्ष तीव्र झाल्याचं पहायला मिळालं आहे. सध्या नवनीत राणा आणि रवी राणांवर राजद्रोहाचे आरोप असल्याने कारागृहात त्यांची रवानगी करण्यात आली आहे. दरम्यान आज शिवसेना प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी खासदार नवनीत राणा (Navneet Rana)  यांच्यावर अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचे नवे खळबळजनक आरोप केले आहेत. राऊतांच्या दाव्यानुसार, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी कनेक्शन असलेल्या युसूफ लकडावाला (Yusuf Lakdawala) याच्याकडून नवनीत राणा यांनी 80 लाखांचे कर्ज घेतले होते. याबाबत ईडीने चौकशी केली आहे का? असाही सवाल राऊतांनी मीडीयाशी बोलताना केली आहे.

संजय राऊत यांनी युसूफ लकडावाला याच्याकडून कर्ज घेतल्याचा दावा करत त्याच्याशी संबंधित कागदपत्र ट्वीट केली आहेत. दरम्यान युसूफ लकडावाला याचा काही महिन्यांपूर्वी कोठडीत मृत्यू झाला आहे. युसूफ लकडावाला प्रसिद्ध बिल्डर आणि डी गँगचा फायनान्सर होता. जमीन खरेदीप्रकरणी ED कडून तो अटकेमध्ये होता.

संजय राऊत ट्वीट

शनिवार, 16 एप्रिल दिवशी मातोश्री या मुख्यमंत्र्यांच्या खाजगी निवासस्थानाबाहेर राणा दाम्पत्य यांनी हनुमान चालिसा पठणाचा आग्रह धरल्याने शिवसैनिक रस्त्यावर उतरले होते. त्यानंतर पोलिसांनी राणा दाम्पत्याला अटक केली. तेव्हा संजय राऊतांनीही प्रक्षोभक वक्तव्य केल्याचा आरोप करत राणांनी राऊतांसह उद्धव ठाकरे, अनिल परब यांच्या विरूद्ध पोलिस तक्रार नोंदवली आहे.