Navneet Rana Cast Certificate Case: नवनीत राणा यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; जात वैधता प्रमाणपत्र वैध
Navneet Rana | File Photo

अमरावतीच्या (Amravati) खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. त्यांच्या जात वैधता प्रमाणपत्रावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द करत सर्वोच्च न्यायालयाने त्यांना निवडणूक लढवण्याचा हिरवा कंदील दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने नवनीत राणा यांचं  मोची जात प्रमाणपत्र अवैध असल्याचं म्हटलं होतं. त्यांचं जातप्रमाणपत्र बोगस असल्याच्या हाय कोर्टाच्या निर्णयामुळे त्यांची खासदारकी धोक्यात आली होती तसेच त्यांच्यावर फौजदारी खटल्याची टांगती तलवार होती पण आता या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

नवनीत राणा आज अमरावती लोकसभेसाठी भाजपाकडून अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज भरणार आहेत. त्यांनी आज सकाळी अर्ज भरण्यापूर्वी देवदर्शन केले होते. अमरावतीत हनुमान गढी वर देखील दर्शन घेतले होते. कोर्टाने त्यांचा अर्ज दाखल होण्यापूर्वी निर्णय देत त्यांना मोठा दिलासा आहे. त्यामुळे आता त्या  आरक्षित जागेवरून निवडणूक लढवू शकणार आहेत. नक्की वाचा:  Amravati Lok Sabha Elections: अमरावती च्या Hanumangarhi Mandir मध्ये उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी Navneet Rana यांनी घेतले दर्शन! 

सर्वोच्च न्यायालयात आज नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्रावर  न्यायमूर्ती जे के महेश्वरी आणि संजय करोल यांनी निकाल दिला आहे. राणा यांचे जात प्रमाणपत्र हायकोर्टाने 2021 मधे अवैध ठरवले होत. त्यानंतर हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेले. सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाच्या निकालाला स्थगिती दिली होती. तसेच बोगस जात प्रमाणपत्र पडताळणी प्रकरणाचा दोनही गटाचा युक्तीवाद 28 फेब्रुवारीला पूर्ण करत आज निकाल दिला आहे.

 नवनीत राणा यांनी दावा केला आहे की तिचे पूर्वज शीख-चांभार जातीचे होते. त्यांचे  पूर्वज मोची-मोची होते आणि कातडीचे चर्मकार- 'चांभार' यांच्याशी संबंधित होते असा दावा करण्यात आला होता.