नवी मुंबईच्या (Navi Mumbai) वाशी खाडीवरील पुलावर (Vashi Khadi Bridge) चढून एक महिला आत्महत्या (Suicide Attempt) करण्याचा प्रयत्न करत असल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. नवी मुंबई पोलिसांच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरूनही हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. संबंधित महिला पुलावर चढून उडी मारण्याच्या प्रयत्नात असताना वाहतूक पोलिसांच्या (Navi Mumbai Traffic Police) सतर्कतेमुळे तिला वाचवण्यात यश आल्याचे समजत आहे. पोलिसांनी महिलेला पुलावरून खेचून बाहेर रस्त्यावर काढले आणि मग तिला शांत करून विचारणा केल्याचे व्हिडीओ मध्ये दिसत आहे मात्र अद्याप या महिलेने आपण आत्महत्या का करत आहोत याचे कारण स्पष्ट केलेले नाही.
व्हिडीओ मध्ये आपण जसे पाहू शकता की, पोलिसांनी महिलेला सुरुवातीला थांबवण्याचा प्रयत्न करताच तिने अधिकच हंगामा करत उडी मारण्याचा इशारा दिला मात्र पोलिसांनी ही परिस्थिती शांतपणे हाताळून अन्य पादचाऱ्यांच्या मदतीने महिलेले पुलावरून बाहेर खेचून काढले.
नवी मुंबई पोलीस ट्विट
Today evening a lady attempt to end her life at Vashi Khadi bridge, however due to excellent presence of mind and prompt action by our Traffic Police staff we succeeded in saving a life. #GreatWork #GreatSave pic.twitter.com/IozpXe8IIA
— Navi Mumbai Police (@Navimumpolice) January 14, 2020
दरम्यान, अशा प्रकारे अनेकांना वाचवून पोलिसांनी यापूर्वीही आपल्या सद्रक्षणाय खलनिग्रहणाय या टॅग लाईनला सार्थ ठरवणारे काम केले आहे.