Marital Rape | Image Used For Representational purpose Only (Photo Credits: Pixabay.com)

चुलत भावाने केलेल्या बलात्कारामुळे (Sister Raped by Cousin) बहिण गर्भवती राहिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडितेचा चुलतभाऊ असलेल्या आरोपी तरुणावर डोंगरी पोलिसांनी (Dongri Police Station) गुन्हा दाखल केला आहे. प्राप्त माहितीनुसार, आरोपी 17 तर पीडिता 15 वर्षांची विद्यार्थीनी आहे. पीडिता इयत्ता दहावीच्या वर्गात शिकते. अभ्यासात मदत करण्याच्या बहाण्याने आरोपीने पीडितेशी सलगी केली आणि तिच्यावर बलात्कार (Rape) केला. पीडिता आठ महिन्यांची गर्भवती आहे. ही घटना नवी मुंबई (Navi Mumbai) येथील जुईनगर (Juinagar) परिसरात घडल्याची माहिती आहे. या धक्कादायक घटनेमुळे पीडिता आणि आरोपीच्या नातेवाईक आणि कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, पीडिता आणि तिचा आरोपी असलेला चुलत भाऊ हे नवी मुंबई शहरातील जुईनगर परिसरात राहतात. आरोपी हा पीडितेला इयत्ता दहावीच्या अभ्यासात मदत करत असे. दरम्यान, त्याने हे कृत्य केले. पीडितेने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, अभ्यासात मदत घेण्यासाठी ती पाठिमागील अनेक महिन्यांपासून आरोपीच्या घरी जात होती. अभ्यासात मदत करण्याच्या बहाण्याने आरोपीने पीडितेशी अनेकदा लगट केली. त्यातून त्याने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्तापीत केले. (हेही वाचा, Uttar Pradesh: लज्जास्पद! काकाचा 7 वर्षीय पुतणीवर बलात्कार, उत्तर प्रदेश येथील घटना)

दरम्यान, प्राप्त तक्रारीवरुन डोंगरी पोलिसांनी आरोपी विरोधात लैंगिक अपराधांपासून मुलांचे संरक्षण – पॉक्सो (POCSO) कायद्यातील कलम 4, 6, 8 अन्वये गुन्हा दाखवला आहे. तसेच, भादंसं कलम 376 अन्वये शून्य एफआयआरही नोंदवाल आहे. हे प्रकरण पुढील तपासासाठी नेरुळ पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले आहे.

दरम्यान, पीडितेला डोंगरी येथील बालगृहात दाखल करण्यात आले. तिथे तिची वैद्यकीय तपासणी केली असता ती गर्भवती असल्याचे पुढे आले. त्यानंतर तिला बालकल्याण समितीसमोर हजर करण्यात आले. बालकल्याण समितीने आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. दरम्यान पीडितेचा गर्भ आठ महिन्यांचा आहे. त्यामुळे तो खाली केल्यास तिच्या जीवीताला धोका असल्याचे कोर्टाने म्हटले.