Uttar Pradesh: लज्जास्पद! काकाचा 7 वर्षीय पुतणीवर बलात्कार, उत्तर प्रदेश येथील घटना
Image used for representational purpose only (Photo Credits: PTI)

देशात महिला अत्याचार आणि अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या बलात्काराच्या (Rape) घटना सतत कानावर पडत आहेत. देशातील विविध कोपऱ्यातून दररोज हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटना समोर येत आहेत. यातच उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) भदोही (Bhadohi) शहरातील कोतवाली परिसरात एका व्यक्तीने स्वत:च्या 7 वर्षाच्या पुतणीवर बलात्कार (Uncle Rapes Nephew) केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना गुरुवारी (2 ऑगस्ट) रात्री घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पीडित मुलीच्या काकाला बेड्या ठोकल्या असून पुढील कारवाईला सुरुवात केली आहे.

साहिल (वय, 22) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी हा आपल्या कुटुंबियांसोबत भोदोही येथील कोतवाली परिसरात राहायला होता. दरम्यान, आरोपीने गुरुवारी रात्री त्याच घरात राहणाऱ्या त्याच्या मोठ्या भावाच्या सात वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी कुटुंबियातील सदस्यांनी साहिलविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली, अशी माहिती पोलीस अधीक्षक रामबदान सिंह यांनी दिली आहे. हे देखील वाचा- Mysore Rape Case: म्हैसूरमध्ये वसतिगृहात राहणाऱ्या 23 वर्षीय तरूणीवर एका व्यक्तीने केला बलात्कार, पोलिसाकडून अधिक तपास सुरू

आरोपीविरोधात कलम 376 (बलात्कार) आणि पॉक्सो कायद्यासह संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच शनिवारी मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर शनिवारी पोलिसांनी आरोपी पकडले. आरोपी हा भदोही रेल्वे स्थानकावरून ट्रेनच्या माध्यमातून पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत, असेही अधीक्षक रामबदान सिंह यांनी म्हटले आहे.