Navi Mumbai Crime: पत्नीशी झालेल्या भांडणात संतापलेल्या पतीने 5 महिन्यांच्या मुलीला संपवले; उरणमधील घटना
Baby (File Image)

Navi Mumbai Crime: नवी मुंबईत कौटुंबीक वादातून एकाने त्याच्या 5 महिन्याच्या चिमुरडीची हत्या केल्याचे समोर आले आहे. नवी मुंबईतील उरण परिसरात रविवारी ९ जून रोजी पहाटे ही घटना उघडकीस आली. खुशीराम ठाकूर (21) असे आरोपी पित्याचे नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. खुशीराम ठाकूर हा रोजंदारीवर काम करतो. तो रोज घरी दारू पिऊन यायचा. आणि पत्निला मारहाण करायचा. होणाऱ्या मारहाणीला कंटाळून पत्नी माहेरी निघूण गेली होती. त्या रागाच्या भरात त्याने मुलीची हत्या केली. (हेही वाचा:Mahalaxmi Express: मुस्लिम महिलेने महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये दिला मुलीला जन्म; देवीचे नाव ठेवण्याचा दाम्पत्याचा निर्णय )

शनिवारी खुशीराम घरी दारू पिऊन आला. त्यानंतर पती पत्नीमध्ये जोरदार भांडण झाले. त्यावर, पत्नी अमृता मुलीच्या सुरक्षिततेच्या भीतीने माहेरी निघूण गेली. मात्र, पत्नीसोबत झालेल्या वादानंतर संतापलेल्या खुशीरामने सासरचे ठिकाण गाठून मुलगी त्याला देण्याची मागणी केली. पत्नी अमृता हिने बाळ देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या खुशीरामने पत्नीपासून मुलीला हिसकावून घेतले.

त्यानंतर त्याने मुलीला जमिनीवर आपटले. त्या घटनेत मुलीचा मृत्यू झाला. खुशीराम आणि अमृता यांचे वर्षभरापूर्वी लग्न झाले होते. रुही असे मृत मुलगीचे आहे. लग्नानंतर ती त्यांची पहिलीच मुलगी होती. अमृताची आई नगीना देवी दिलेल्या माहितीनुसार,खूशीरामच्या दारूच्या व्यसनामुळे पती-पत्नींमध्ये वारंवार भांडण व्हायचे. खुशीराम मद्यधुंद अवस्थेत घरी येऊन त्यांच्या मुलीवर अत्याचार करायचा, असेही त्यांनी सांगितले. खुशीरामने अनेकवेळी बाळाला आणि त्यांच्या मुलीला जीवे मारण्याची धमक्या दिल्या होत्या. असा दावा अमृताचे वडील बिन्नीलाल राम यांनी केला आहे.