Mahalaxmi Express: कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये मुस्लीम महिलेने मुलीला जन्म दिला. त्या नवजात मुलीला देवीचे नाव देण्याचा निर्णय दाम्पत्याने घेताला आहे. 6 जून रोजी लोणावळा स्थानक ओलांडल्यानंतर मीरा रोड येथील फातिमा खातून या 31 वर्षीय महिलेने कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेस(Kolhapur-Mumbai Mahalaxmi Express)मध्ये एका गोंडस मुलीला जन्म(Girl Birth) दिला. तिचे नाव दामपत्याने रेल्वेच्या नावावरून महालक्ष्मी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार "मुलीचा जन्म कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये होणे म्हणजे देवीचे दर्शन झाल्यासारखे आहे. म्हणून मी तिचे नाव महालक्ष्मी ठेवण्याचा निर्णय कुटुंबाने घेतला," असे नवजात मुलीचे वडिल तय्यब यांनी म्हटले.
फातिमा आणि तय्यब यांना तीन मुलगे आहेत. फातिमा यांच्या प्रसूतीची तारीख 20 जून असल्याने, कुटुंब 6 जून रोजी कोल्हापूर-मुंबई रेल्वेत प्रवास करत होते. मात्र, अचानक इंजिन बिघाडामुळे लोणावळा येथे दोन तासांहून अधिक वेळ रेल्वे थांबवली होती. त्याच दरम्यान, रात्री 11 च्या सुमारास पुन्हा रेल्वे सुरू झाल्यावर, पत्नी फातिमा यांना प्रसूतीकळा जाणून लागल्या आणि त्यादरम्यान बाळाचा जन्म झाला. रेल्वे कर्जत स्थानकात आल्यावर कुटुंबीय उतरले.
कर्जत जीआरपीचे एपीआय मुकेश ढंगे यांनी माहिती देत म्हटले की " कर्जत उपजिल्हा रुग्णालयाला घटनेबाबत अलर्ट केले त्यानंतर परिचारिका शिवांगी साळुंके आणि कर्मचारी स्टेशनवर पोहोचले. महिला आणि बाळाला पुढील उपचारासाठी तातडीने रुग्णालयात नेण्यात आले." त्यानंर तीन दिवसांच्या उपचारानंतर आई आणि बाळाला घरी सोडण्यात आल्याचे हॉस्पिटलच्या सहाय्यक मॅट्रन सविता पाटील यांनी सांगितले.