तक्रार मागे घेण्यासाठी बलात्कारातील (Rape) आरोपीच्या पत्नीकडून पैसे उकळल्याची घटना समोर आली आहे. या आरोपाखाली नवी मुंबईतील एनआरआय कोस्टल पोलिसांनी (NRI Coastal Police) बलात्कार पीडिता, तिची आई आणि आणखी एका महिलेसह पाच जणांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिन्याच्या सुरुवातीला त्यांनी एका व्यक्तीला 19 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. नुकतीच सामाजिक कार्यकर्ता (Social worker) असल्याचा दावा करणाऱ्या एका आरोपी महिलेने बलात्काराच्या आरोपीच्या पत्नीशी संपर्क साधला. तसेच तिच्या पतीवर दाखल केलेला खटला मागे घेण्यासाठी 14 लाख रुपयांची मागणी केली.
पत्नीने मात्र तिच्याकडे इतके पैसे नसल्याचे सांगितले आणि नंतर वाटाघाटीनंतर तक्रारदाराला अडीच लाख रुपये देण्याचे ठरले. त्यापैकी 50 हजार रुपये सामाजिक कार्यकर्त्याला द्यायचे होते. पोलिसांनी सांगितले की, बलात्कार आरोपीच्या पत्नीला रक्कम देण्याची इच्छा नसल्याने तिने पोलिसांकडे जाऊन तक्रार दाखल केली.
तक्रारीच्या आधारे पोलिसांनी पडताळणी सुरू केली. या प्रकरणी पोलिसांना सापळा रचत मंगळवारी आरोपींना पैसे स्वीकारताना रंगेहात पकडले. पोलिसांनी मंगळवारी सापळा रचून तक्रारदार, तिची आई, पैशांची मागणी करणारी महिला आणि तिच्यासोबत असलेल्या दोन पुरुषांना सीवूड्स परिसरात सीवूड्स परिसरात मंगळवारी अटक केली. हेही वाचा Buldhana Murder Case: बुलढाण्यामध्ये दारुसाठी 10 रुपये देण्यास नकार दिल्याने मित्राचा खून, पोलिसांकडून दोन जणांना अटक
एनआरआय कोस्टल पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र पाटील म्हणाले, आम्ही पाचही आरोपींना अटक केली आणि त्यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 188 खंडणी आणि 34 सामान्य हेतू अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आरोपींची कसून चौकशी करत असून त्यांच्याशी संबंधित अशा टोळ्यांचाही शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत.