महाराष्ट्रातील (Maharashtra) बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यात दारूसाठी 10 रुपये देण्यास नकार दिल्याने एका 50 वर्षीय व्यक्तीची त्याच्या दोन मित्रांनी हत्या (Murder) केली आहे. पोलिसांनी सांगितले की, 50 वर्षीय भागवत सीताराम आणि त्याचे आरोपी मित्र विनोद लक्ष्मण वानखेडे आणि दिलीप त्र्यंबक बोदडे हे दारू पिण्यासाठी दारूच्या दुकानात गेले. त्यांच्याकडे 10 रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्याने दोघांनी त्याच्यावर हल्ला केला. भागवत सीताराम यांनी त्यांना पैसे देण्यास नकार दिल्याने ते संतापले. सीताराम हे दुकानातून बाहेर येत असताना आरोपींनी त्यांच्या डोक्यावर मागून लाकडी दांडक्याने हल्ला केला. या हल्ल्यात भागवत सीताराम हे खाली पडले आणि डोक्याला मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला.
घटनेच्या तासाभरातच पोलिसांनी आरोपीला अटक केली. सीतारामचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला. पोलिसांनी सांगितले की या हल्ल्यात डोक्याला गंभीर दुखापत झाली, ज्यामुळे शेवटी त्याचा मृत्यू झाला. पोलीस अधिकारी प्रल्हाद काटकर म्हणाले, होताीआम्हाला एका फोनवर माहिती मिळाली की दारूच्या दुकानात एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडली आहे. आम्ही घटनास्थळी पोहोचलो तोपर्यंत त्या व्यक्तीचा मृत्यू झाला होता. आम्ही तासाभरात मारेकऱ्यांना अटक करून गुन्हा दाखल केला. त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल आहे. हेही वाचा यवतमाळ: बिबट्याविरुद्ध 19 वर्षीय मुलीने दाखवली हिंमत; बादलीच्या साहाय्याने प्रतिकार करत वाचवला स्वत:चा जीव
पुण्यातील येरवडा परिसरात तीन महिन्यांच्या बाळाची आईनेच गळा आवळून हत्या केली होती. नवजात अर्भकाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून पल्लवी भोंगे आणि तिच्या 13 वर्षीय मुलाला अटक करण्यात आली होती. प्राथमिक तपासाअंती पोलिसांनी सांगितले की, ही महिला मूळची बुलढाणा येथील असून तिचे नुक्षन जिल्ह्यात राहणाऱ्या एका मजुराशी अनैतिक संबंध होते.
अहवालानुसार, आरोपी महिला आधीच तिच्या पतीपासून दूर राहत होती. गावातील सर्वांना तिचे अफेअर आणि तिची गरोदरपणाची माहिती होती. मात्र तीन महिन्यांपूर्वी महिलेने एका मुलीला जन्म दिला. मुलीची हत्या केल्यानंतर, महिलेने तिच्या 13 वर्षांच्या मुलाला मृतदेह त्यांच्या घरापासून थोड्या अंतरावर असलेल्या नदीच्या पात्रात टाकण्यास सांगितले. चौकशी केल्यानंतर अल्पवयीन मुलाने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर त्यांना घटनास्थळी तपासणीसाठी नेण्यात आले. पोलिसांना बॅग सापडली तेव्हा मृतदेह दगडाखाली दबलेला दिसला.