Navi Mumbai Municipal Corporation (Photo Credits-Facebook)

नवी मुंबईची महानगरपालिका निवडणूक येत्या एप्रिल 2020 मध्ये पार पडणार आहेत. तर राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांच्या आदेशानुसार नवी मुंबई महापालिका निवडणूक 2020 च्या अनुषंगाने प्रारुप प्रभाग रचना आणि महिला संरक्षण सोडत 1 फेब्रुवारीला संपन्न झाली. अनुसुचित जमाती, अनुसुचित जाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग आणि सर्वसाधारण अशाप्रकारे विहित निकष व पध्दतीनुसार सोडत काढण्यात आली. याच पार्श्वभुमीवर भारतीय शेतकरी कामगार पक्ष सुद्धा निवडणूकीत उतरणार असल्याचा निर्णय त्यांनी जाहिर केला आहे.

भारतीय शेतकरी कामगार पक्षाने समविचारी पक्षांच्या मदतीने नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. तर पक्ष लढवणार असल्याच्या जागा, मित्र पक्ष आणि पक्षाची भुमिका याबाबत माहिती देण्यासाठी 27 फेब्रुवारीला दुपारी 3 वाजता एका पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे.तर नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2020 करिता सन 2011 ची जनगणना ग्राह्य धरण्यात आली असून एकूण 111 सदस्य संख्येमध्ये अनुसूचित जमाती करिता 2, अनुसूचित जाती करिता 10, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग करिता 30 व सर्वसाधारण 69 सदस्य असणार आहेत. त्यापैकी 50 टक्के महिला सदस्य संख्या असणार असून अनुसूचित जमाती 1, अनुसूचित जाती 5, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग 15 व सर्वसाधारण 35 अशी 56 महिला सदस्य संख्या असणार आहे.(नवी मुंबईत राजकीय खळबळ, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नगरसेवक भाजपात जाणार?)

नवी मुंबई महापालिकेच्या एकूण 111 आहेत.यापूर्वीच्या महापालिका निवडणूकीत नवी मुंबई येथील  भाजपला 56, शिवसेनेला 38, राष्ट्रवादीला 2, काँग्रेसला 10 तर, इतरला 5 जागा मिळाल्या होत्या. महत्वाचे म्हणजे, गणेश नाईक यांच्या भाजप प्रवेशाआधी राष्ट्रवादीकडे 52 नगरसेवक होते. मात्र, नाईकांनी 49 नगरसेवकांसह भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेत भाजपचे वर्चस्व निर्माण झाले होते.