Navi Mumbai MNS: नवी मुंबई मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्याविरोधात पत्नीची तक्रार, गुन्हा दाखल
Gajanan Kale | Photo Credits: Facebook)

नवी मुंबई मनसे (Navi Mumbai MNS) शहर अध्यक्ष गजानन काळे (Gajanan Kale) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. गजानन काळे यांच्या पत्नीनेच हा गुन्हा दाखल केल्याने मनसे (MNS) मध्ये खळबळ उडाली आहे. काळे यांच्यावर पत्नीने लावलेले आरोपही गंभीर आहेत. मानसिक आणि शारीरिक छळ, परस्त्रीयांशी अनौतिक संबंध, जातिवाचक शिवीगाळ अशा प्रकारचे गंभीर आरोप पत्नीने काळे यांच्यावर केले आहेत. या प्रकरणात नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काळे हे पाठीमागील काही वर्षांपासून सातत्याने आपल्याला मारहाण करत असल्याचाही आरोप एफआयआरमध्ये आहे.

पोलिसांनी प्रसारमाध्यमांना माहिती देताना सांगितले की, काळे यांच्या पत्नीने दिलेल्या तक्ररीत म्हटले आहे की, तक्रारदार महिलेचा पती हा तीला (तक्रारदार-पत्नी) शारीरिक आणि मानसिक त्रास देत असेल. सातत्याने जातीवाचक शिवीगाळ आणि रंगावरुन टोमणे मारत असे. अखेर पीडित महिलेने पोलिसात तक्रार केली. (हेही वाचा, मुंबई लोकल संदर्भात मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाचं मनसे कडून स्वागत (View Tweet))

दरम्यान, गजानन काळे यांच्या पत्नीने तक्रारीत म्हटले आहे की, माझ्या पतीचे अनेक परस्त्रीयांसोबत संबंध आहेत. त्याला रात्री-अपरात्री येणाऱ्या फोनकॉल, मेसेज यावरून हे माझ्या सातत्याने लक्षातय यायचे. मी त्यांना याबाबत विचारले असता 'तू यात लक्ष घालू नको. त्या माझ्या काही पत्रकार मैत्रीणी आहेत', असे सांहून मारहाण केली. अशा प्रकारची मारहाण अनेकदा झाली आहे.

काळे यांच्या पत्नीने पुढे म्हटले आहे की, सन 2008 मध्ये आमचा विवाह झाला. त्यानंतर पुढचे काही दिवस सगळे सुरळीत सुरु होते. मात्र, अल्पावधीतच आमच्यात भांडण सुरु झाले. तू सावळीच आहेस. तुझ्याशी विवाह करुन काहीही फायदा झाला नाही. केवळ तुझ्या वडीलांचा हुद्दा पाहून तुझ्याशी लग्न केलं, असे पती सातत्याने ऐकवत असतात असाही आरोप काळे यांच्यावर त्यांच्या पत्नीने केला आहे.