कोविड-19 लसीचे (Covid-19 Vaccines) दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना 15 ऑगस्टपासून लोकल प्रवासाची परवानगी राज्य सरकारकडून देण्यात आली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक सुखावले असून मनसे (MNS) कडून या निर्णयाचं स्वागत करण्यात आलं आहे. यासाठी पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर एक ट्विट करण्यात आलं आहे. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांसाठी लोकल सुरु करण्याची मागणी केली होती. ही मागणी मान्य झाल्याने मनसेने खास ट्विट केले आहे. (सामान्यांना लोकल प्रवासाची मुभा द्या, अन्यथा रेलभरो आंदोलनाचा मनसेचा इशारा)
मनसे ने ट्विटमध्ये म्हटले की, "मुंबईकरांचे हाल थांबवण्यासाठी तसंच मुंबईचं अर्थचक्र सुरळीत करण्यासाठी ज्यांनी लसीच्या दोन मात्रा घेतल्या आहेत. त्यांना लोकल प्रवासाची परवानगी द्यावी, अशी अत्यंत आग्रही मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली होती. जनतेशी संवाद साधताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लसीच्या दोन मात्रा घेतलेल्यांना 15 ऑगस्टपासून लोकल प्रवास करता येईल ही घोषणा केली. जनभावनेचा आदर करत मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या या निर्णयाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वागत करत आहे." (Mumbai Local Updates: कोरोनाचे दोन्ही डोस घेतलेल्यांनी मुंबई लोकलचा पास कसा मिळवायचा? संपूर्ण प्रक्रिया घ्या जाणून)
MNS Tweet:
#MumbaiLocals#मुंबईलोकल pic.twitter.com/k9IlIT1JS3
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) August 8, 2021
काल जनतेशी संवाद साधताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 15 ऑगस्टपासून लसीचे दोन्ही डोस घेऊन 14 दिवस झालेल्यांना लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आल्याची घोषणा केली. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे. यापूर्वी मनसेकडून ही मागणी जोर धरत होती. राजसाहेबांची विनंती मान्य न केल्यास रेलभरो आंदोलनाचा इशाराही मनसेने दिला होता.