Navi Mumbai Crime: तुर्भेत वडापाव विक्रेत्याकडून रिक्षा चालकाची हत्या; पोलिसांकडून संशयिताला अटक
Crime Image File

नवी मुंबई शहरात सध्या गुन्हेगारीचे प्रमाण हे मोठ्या प्रमाणावर वाढले असून यामुळे नवी मुंबई पोलिसांवरील दबाव हा वाढला आहे. नवी मुंबईतील तुर्भे येथे अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे.  या ठिकाणी एका रिक्षा चालकाची हत्या झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर हत्यारा स्वत:हून पाेलिस ठाण्यात हजर झाला. पाेलिस संशयिताची कसून चाैकशी करीत असून हत्येचे कारण आणि ती कशी झाली याबाबतची माहिती जाणुन घेत आहे. दरम्यान या हत्येच्या घटनेनंतर तुर्भे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. (हेही वाचा - Nitin Desai Suicide Case: नितिन देसाई यांना आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी दाखल FIR विरूद्ध Edelweiss Group Chairman ची Bombay High Court मध्ये धाव)

नवी मुंबईत  तुर्भे येथील एका वडापाव विक्रेत्याने रिक्षा चालक रमेश चव्हाण याची हत्या केल्याची केल्याची घटना घडली. रिक्षा बाजूला काढण्याच्या शुल्लक कारणावरून वाद झाला होता.रिक्षा चालकाने त्याची रिक्षा ही संशयिताच्या दुकानासमोर लावली होती. चव्हाण याच्या छातीत स्क्रूड्राइवर घुसवून ही हत्या करण्यात आली आहे.