Drown | Image Used For Representational purpose Only (Photo Credits: Pixabay.com)

Kharghar News: नवी मुंबई येथील खारघर परिसरातील एका १३वर्षीय मुलाचा गेल्या आठवड्यात पांडवकडा धबधब्यात बुडून मृत्यू झाला. हर्ष पफ्पू गौतम असे मृताचे नाव असून तो खारघरमधील सेक्टर 21 मध्ये राहणारा होता. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. रविवारी सकाळी त्याचा मृतदेह पोलिलांच्या हाती सापडला. खारघर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेतली आहे. धबधब्याच्या पाण्यात प्रवेश करण्यात मनाई असताना देखील मुलांनी हे धाडस केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौतम हा त्याच्या मित्रांसह शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास खारघरच्या डोंगराळ भागात गेला होता. त्यांनी पांडवकडा धबधब्याच्या पाण्यात पोहण्याचे ठरवले. फोटो काढण्यासाठी आणि मस्ती मजाक करण्यासाठी सर्व मित्र पाण्यात पोहण्यासाठी खाली उतरले. गौतमला चांगल्या प्रकारे पोहता येत नव्हते मित्राच्या सांगण्यावरून तो खाली पाण्यात उतरला आणि  काही  क्षणातच पाण्यात बुडाला. त्याच्या मित्रांनी घाबरून त्याच्या कुटुंबाला फोन केला ज्यानंतर पोलीस आणि खारघर अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले.

जवळपास 16 तासांच्या शोधानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला. तात्काळ शोध मोहीम सुरू करण्यात आली, ती संध्याकाळी उशिरापर्यंत सुरू होती, परंतु तरुण मुलगा बेपत्ता राहिला. रविवारी सकाळी हर्षचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. अखेर ही भीषण प्रतीक्षा संपली. खारघर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून घेतली आहे. पुढील तपास सुरू केला आहे. खारघर पोलिसांनी धबधब्याच्या पाण्यात जाण्यास मनाई केली असताना देखील मुलांनी हे धाडस केल. आणि एका मुलाने प्राण गमावले.