Ajit Pawar | (Photo Credits: ANI/Twitter)

Ajit Pawar On NCP Political Crisis: रविवारपासून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. राष्ट्रवादी नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी शरद पवारांची साथ सोडून शिंदे-फडणवीस सरकारशी (Shinde-Fadnavis Government) हातमिळवणी करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. दरम्यान, आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुनील तटकरे (Sunil Tatkare) आणि प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांना निलंबित केलं आहे.

तथापी, अजित पवार (Ajit Pawar) यांनी पत्रकार परिषद घेत कार्यकारणीची घोषणा केली आहे. अजित पवार यांच्या गटाने जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवलं आहे. प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादीच्या नव्या कार्यकारणीची घोषणा केली आहे. यावेळी अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व चिन्ह आमच्याबरोबरच असल्याचा दावा केला आहे. (हेही वाचा -Maharashtra NCP President: सुनील तटकरे यांची महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती, तर Ajit Pawar यांची विधीमंडळ नेतेपदी निवड; बंडखोर नेते Praful Patel यांची घोषणा)

पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवार म्हणाले की, नऊ आमदारांवर अपात्रतेच्या कारावाईची नोटीस बेकायदेशीर असून एकाच नेत्याला प्रतोद आणि विरोधी पक्षनेतेपदी राहता येत नाही. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बळकटीसाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. विधानसभा अध्यक्ष विरोधी पक्षनेतेपदाची निवड करतात. आम्ही सगळे राष्ट्रवादीत काँग्रेस पक्षातचं आहोत. संभ्रम निर्माण होण्यासाठीच ही नियुक्ती करण्यात येत असल्याचा आरोपही यावेळी अजित पवार यांनी केला.

अजित पवार पुढे बोलताना म्हणाले की, कालपासून ज्या-ज्या नोटिसा काढल्या आहेत आल्या. त्या काढण्याचा कोणताही अधिकार त्यांना नाही. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह आमच्याबरोबरचं आहे, असा दावाही अजित पवार यांनी केला आहे.