ठेकेदार,अधिकाऱ्यांनी मनावर घ्यायला पाहिजे, डॉ. आंबेडकर यांचं इंदू मिल येथील स्मारक दोन वर्षात उभं राहणं शक्य-शरद पवार
Sharad Pawar | Sharad Pawar | (Photo Credit-Facebook)

मुंबईतील इंदू मिल (Indu Mill) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Ambedkar Statue) यांचे स्मारक येत्या दोन वर्षांमध्ये उभं राहणं शक्य आहे. फक्त ठेकेदार आणि अधिकाऱ्यांनी मनावर घ्यायला पाहिजे. आगोदरच या स्मारकाला विलंब झाला आहे. आता त्यापेक्षा अधिक विलंब लागू नये, याची काळजी घ्यायला हवी, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (Nationalist Congress Party) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी व्यक्त केले आहे. न्यूयॉर्क येथे गेल्यावर स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पाहण्यासाठी लोक जातात. त्याचप्रमाणे इंदू मिल येथील डॉ. आंबेडकर यांचे स्मारक पाहण्यासाठीही लोक येतील, असे पवार म्हणाले.

शरद पवार यांनी इंदू मिल येथे जाऊन डॉ. आंबेडकर स्मारकासाठी असलेल्या नियोजीत जागेची पाहणी केली. ही पाहणी केल्यावर पवार पत्रकारांशी बोलत होते. या वेळी बोलताना पवार म्हणाले, डॉ. आंबेडकर स्मारकाचे जवळपास 25 टक्के काम पूर्ण झालं आहे. आता केवळ 75 टक्के काम बाकी आहे. या स्मारकाचे काम करणारी कंपनी आंतरराष्ट्रीय दर्जाची आहे. त्यामुळे हे काम वेगाने होण्यासाठी अधिकारी आणि कंत्राटदार यांनी ठरवल्यास येत्या दोन वर्षांमध्ये हे काम विनाविलंब पूर्ण होईल.

दरम्यान, या स्मारकाचे काम असे व्हावे की जगभरातील पर्यटक हे काम पाहण्यासाठी मुंबईत येथील. डॉ. आंबेडकर यांच्या स्मारकाचे जगभरातील पर्यटकांना आकर्षण वाटावे. दरम्यान, आधिच्या सरकारने या स्मारकाचं काम रखडवलं का? असे पत्रकारांनी विचारले असता, डॉ. आंबेडकर यांच्या स्मारकासाठी ज्यांनी ज्यांनी हातभार लावला त्या सर्वांचे आभार. आपण उगाच कोणावर टीका टीप्पणी कशाला करायच? असे म्हणत या विषयावर बोलणे पवार यांनी टाळले.