Nashik Weather Forecast For Tomorrow: नाशिक चे उद्याचे हवामान कसे असेल? जाणून घ्या वातावरणाचा अंदाज!
Photo Credit- x

Nashik Weather Forecast For June 17: नाशिक गेल्या चार ते पाच दिवसापासून जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाऊस हजेरी लावत आहे. त्यामुळे शेतीच्या कामांना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. गुरुवारी नाशिक शहरात जोरदार पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. तर अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच धावपळ झाली.शहरातील सिडको, सातपूर, सीबीएस, शालीमार या परिसरासह आदी भागांत पावसाने हजेरी लावली. शहरातील सकल भागात पावसाने रस्त्यांवर पाणी साचल्याची परिस्थिती निर्माण झाली. यामुळे वाहनधारकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला. तासाभराच्या पावसाने नाशिकच्या रस्त्यांवर पाणी साचल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.यावेळी नागरिकांकडे रेनकोट व छत्री नसल्याने त्यांनी लपण्यासाठी ठिकठिकाणी दुकानांच्या गाळ्यांचा आडोसा घेतल्याचे दिसून आले.आजच्या हवामान अंदाजनुसार आज ढगाळ वातावरण रहाण्याची शक्यता आहे.हेही वाचा:  Pune Tomorrow Weather Forecast: पुण्याचे उद्याचे हवामान कसे असेल? जाणून घ्या आयएमडीने वर्तवलेला अंदाज!

भारताच्या हवामान खात्याने (IMD) जाहीर केले आहे की नैऋत्य मान्सून देशाच्या विविध भागांमध्ये पुढे जाण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्र,छत्तीसगड, ओडिशा, किनारी आंध्र प्रदेश आणि वायव्य बंगालचा उपसागर, गंगेच्या पश्चिम बंगालचा काही भाग, उप हिमालयीन पश्चिम बंगालचा उर्वरित भाग आणि बिहारचा काही भाग पुढील 4-5 दिवसांत.