कोरोना विषाणूने संपूर्ण भारतात थैमान घातला आहे. कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. यातच कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी संपूर्ण भारतात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्वकाही बंद ठेवण्यात आले आहेत. दरम्यान, नाशिक (Nashik) येथील कामटवाडा (Kamtawada) परिसरात सिगारेट न दिल्याने गावगुडांनी दुकानदाराला मारहाण केल्याची घटना उघडकीस आले आहेत. ही घटना गुरुवारी मध्यरात्री 3.30 च्या सुमारास घडली. एवढचे नव्हे तर, आरोपींनी दुकानासमोरील पीडिताची रिक्षा आणि दुचाकीचीही तोडफोड केली. तसेच हा वाद मिटवण्यासाठी आलेल्या पडीताच्या भावाला जावे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली आहे. यात एका विधीसंघर्षित बालकाससुद्धा समावेश आहे.
नाजीम शाहाबुद्दी खाटीक असे मारहाण झालेल्या दुकानदाराचे नाव आहे. नाजीम याचे कामटवाडा परिसरात किराणामालाचे दुकान आहे. गुरुवारी नाजीम हे रात्री 3.30 सुमारास झोपलेले असताना प्रशिक अडंगळे, राहुल शेवाळे याच्यासह एका विधीसंघर्षित बालकाने त्यांचा दरवाजा ठोठावला. त्यावेळी प्रशिक, राहुल यांनी नाजीमला सिगारेट मागितली. नाजीम यांनी दरवाजा उघडला असता तिघांनी त्यांच्याकडे सिगारेटची मागणी केली. दुकानातील सिगारेट संपल्या आहेत, तुम्ही दुकानात येवून बघा, असे त्यांनी तिघांना सांगितले. राग अनावर झालेल्या तिघांनी कोयता, लाकडी दांडके घेवून परिसरात दहशत निर्माण करत खाटीक यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांच्यावर कोयत्याने वार केले. नाजीम यांचे भाऊ मध्यस्थी झाले असता सिगारेट न दिल्याने त्यास सोडणार नाही, त्याला संपल्याशिवाय राहणार नाही, अशी धमकी दिली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. हे देखील वाचा- Coronavirus: दादर मधील शुश्रुषा रुग्णालयात 2 नर्सला कोरोनाची लागण झाल्यानंतर नव्या रुग्णांना प्रवेश नाही-BMC
सध्या राज्यावर कोरोनाचे मोठे संकट वावरत असाताना काही लोक स्वत:हून सरकारच्या मदतीला धावत आहेत. तर जण याचा गैरफायदा घेत नागरिकांवर अत्याचार करत आहेत. सध्या गुन्हेगारांच्या आकड्यात घट झाल्याचे समजत आहेत. मात्र, वरील घटनेने सर्वांचे लक्ष केंद्रीत करून घेतले आहे.