Coronavirus in India | Representational Image (Photo Credits: PTI)

महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा (Coronavirus) प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोनापासून स्वत:चा बचाव करायचा असेल तर घरीच थांबण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे. तर मुंबईतील दादर परिसरात आता पर्यंत 6 कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. याच पार्श्वभुमीवर दादर येथील शुश्रुषा (Shushrusha HospitaL या खासगी रुग्णालयातील दोन नर्स कर्मचाऱ्यांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. त्यामुळे महापालिकेने (BMC) आता रुग्णात नव्या रुग्णांना प्रवेश देणे थांबवण्याचे आदेश दिले आहेत. रुग्णालयाला 48 तासांचा कालावधी दिला असून रुग्णालयातील रुग्णांना डिस्चार्ज देण्यास सांगण्यात आले आहे.

शुक्रवारी शुश्रुषा रुग्णालयाती 27 वर्ष आणि 42 वर्षीय नर्सला कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. त्यामुळे महापालिकेने जवळजवळ 28 नर्सला क्वारंटाइनचा सल्ला दिला आहे. तसेच रुग्णालयतील सर्व नर्सने त्यांच्या पैशांनी स्वत:हून कोरोनाची चाचणी करावी असे नागरी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. त्याचसोबत कोरोनाची चाचणी केल्यानंतर महापालिकेडून या नर्सला दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात येऊ शकते. तर आता शुश्रुषा येथे कोणत्याही नव्या रुग्णाला प्रवेश दिला जाणार नाही आहे.(मुंबई: दादर येथील शुश्रुषा हॉस्पिटल मध्ये 2 नर्सला कोरोनाची लागण; परिसरातील एकूण Covid 19 पॉझिटिव्ह रूग्नांची संख्या 6 वर)

दरम्यान, कोरोनाबाधितांचा आकडा महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. तर मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा 700 च्या पार गेला आहे. ही संख्या खूपच धक्कादायक असून दिवसेंदिवस महाराष्ट्रातील स्थिती गंभीर बनत चालली आहे. तर भारतात 547 नव्या रुग्णांसह आज कोरोना बाधितांची एकूण संख्या 6412 इतकी झाली आहे. यात गेल्या 12 तासांमध्ये 30 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ही संख्या खूपच धक्कादायक असल्याचे आरोग्य मंत्रलायाकडून सांगण्यात येत आहे.