BMC to procure 1 lakh Rapid Test Kits for COVID19 | Representational Image | (Photo Credits: IANS)

महाराष्ट्रात दिवसागणिक कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. अशामध्ये आता मुंबई शहरातही कोरोनाचा विळखा वाढत आहे. आज मुंबईच्या दादर भागामध्ये 3 नवे कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने नागरिकांच्या चिंतेमध्ये वाढ झाली आहे. दादरच्या शुश्रुषा हॉस्पिटलमध्ये 2 नर्स आणि केळकर मार्गावरील परिसरात 1 पुरूष कोरोनाबाधित म्हणून आढळला आहे. सध्या मुंबईचं हार्ट अशी ओळख असणार्‍या दादर भागामध्ये 6 कोरोनाचे रूग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रात सध्या कोरोनबाधितांची संख्या 1300 पेक्षा अधिक आहे त्यापैकी निम्म्याहून अधिक जण मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये असल्याने आणि सातत्याने त्यामध्ये वाढ होत असल्याने आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल याबाबत चिंता व्यक्त केली आहे. Coronavirus: भारतात 547 नव्या रुग्णांसह देशात कोरोना बाधितांची संख्या 6412 वर तर 199 रुग्णांचा मृत्यू.  

दरम्यान आज नव्याने आढळलेल्या दादर भागातील रूग्णांमध्ये नर्सचा समावेश झाल्याने मुंबई शहरातील आरोग्य यंत्रणा सुरक्षित नसल्याची बाब पुन्हा समोर आली आहे. यापूर्वीदेखील मुंबईमध्ये सहा नामांकित हॉस्पिटलमधील मेडिकल स्टाफ कोरोना व्हायरसच्या विळख्यात अडकल्याने तेथील नियमित आरोग्यसेवा काही काळ स्थगित करण्यात आली होती. मुंबई: Wockhardt, Jaslok पाठोपाठ Hinduja Khar, Spandan, Breach Candy, Bhatia Hospital मध्ये मेडिकल कर्मचार्‍यांना कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर रूग्णांसाठी नियमित सेवा बंद

ANI Tweet 

मुंबईत दादरच्या नजिक असलेला जी साऊथ या वॉर्डमध्ये मुंबईतील सर्वाधिक रूग्ण आहे. या भागात वरळी, प्रभादेवी अशा परिसराचा समावेश आहे. सध्या या भागातील वरळी कोळीवाडा हा कोरोनाचा सर्वाधिक प्रभावित हॉटस्पॉट झाला आहे. त्यामुळे आता या भागामध्ये लॉकडाऊन अधिक कडक करण्याचे निर्णय घेण्यात आले आहे. मुंबई शहरात नागरिक अजूनही अनेक ठिकाणी अनावश्यक गर्दी करत असल्याचं लक्षात आल्याने मुंबई पोलिसांसोबतच नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी आता राज्य राखीव दलाला पाचारण केले जाणार आहे.