दिव्यांग सावत्र मुलाचे (Physically Challenged Stepson) गुप्तांग (Private Parts) जाळल्या प्रकरणी पोलिसांनी एका 35 वर्षीय महिलेला अटक केली आहे. ही धक्कादायक घटना नाशिक (Nashik) मधील पाडे (Pade) गावात 7 जून रोजी घडली. महिलेच्या पतीने तक्रार दाखल केल्यानंतर महिलेला अटक झाली आहे. पीडित मुलगा 10 वर्षांचा आहे. त्याच्यावर नाशिक मधील सिव्हील हॉस्पिटलमध्ये (Nashik Civil Hospital) उपचार सुरु असून त्याची प्रकृती स्थिर आहे. गुप्तांग आणि ओटीपोटाजवळील भाग 20 टक्के भाजला आहे. (गुजरात: सावत्र आई कडून 2 मुलांची पाण्यात बुडवून हत्या, गुन्ह्याचा पश्चाताप होताच सांगितले सत्य)
टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, दिव्यांग मुलगा त्याच्या दीड वर्षांच्या सावत्र मुलासोबत बेडवर खेळत होता. खेळताना धक्का दिल्याने लहान मुलगा खाली पडला. त्यानंतर महिलेने दिव्यांग मुलाला मारायला सुरुवात केली. त्यानंतर तिने पलेता गरम करुन तिच्या गुप्तांगावर ठेवला.
दिव्यांग मुलगा जोरजोराने रडायला लागल्याने शेजारची मंडळी जमा झाली. शेजारीच राहणाऱ्या कुटुंबियांच्या नातेवाईकांनी महिलेच्या पतीला फोन करुन सर्व हकिकत सांगितली. कामवरुन परत येताच त्याने मुलाला घेऊन हॉस्पिटल गाठले. दरम्यान, पीडित मुलाच्या गुप्तांगाला फारशी इजा पोहचली नसल्याचे सिव्हील सर्जन किशोर श्रीवास यांनी सांगितले.
मात्र या घटनेनंतर पतीने महिलेविरुद्ध पोलिस स्थानकांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम 326, 324 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून महिलेला अटक केली आहे. विशेष म्हणजे आरोपी महिला पीडित मुलाची मावशी आहे. त्याच्या वडीलांनी त्याच्या आईला घटस्फोट देऊन चार वर्षांपूर्वी त्याच्या मावशीची विवाह केला होता.