Indian Rowing Player Dattu Baban Bhokanal (Photo Credits-Twitter)

भारतीय रोविंगपटू (Rowing)  दत्तू भोनकळ (Dattu Bhokanal)  याच्यावर काही दिवसांपूर्वी महिलेने आडगाव पोलीस स्थानकात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. मात्र आता दत्तू भोनकळ याला अटक होण्यापूर्वी नाशिक (Nashik) जिल्हा न्यायालयाने दिलासा दिला आहे. तर 15 हजार रुपयांचा दंड भरल्यानंतर दत्तू याला जामीनावर सोडण्यात आले आहे. मात्र आठवड्यातून एकदातरी दत्तूला आडगाव पोलीस स्थानकात हजेरीसाठी जावे लागणार आहे.

तसेच महिलेला कोणत्याही प्रकाचा त्रास देणार नसल्याची कबुली दत्तूकडून करवून घेण्यात आली आहे. तर न्या. एन.जी. गिमेकर यांनी संध्याकाळी या प्रकरणावर सुनावणी करत निर्णय दिला आहे. तसेच दत्तूने यावेळी महिला आपली बायको असून तिच्यासोबत मी लग्न केले असल्याचे मान्य केले आहे.(नाशिक: रोविंग खेळाडू दत्तू भोकनळ यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल; लग्नासाठी टाळाटाळ करत असल्याचा प्रेयसीचा दावा)

मात्र न्यायमुर्तींनी दिलेल्या निर्णयामुळे महिला नाराज आहे. तर महिलेच्या वकिलांनी महिला कायद्याअंतर्गत या प्रकरणी दाद मागू असे म्हटले आहे.