Nashik Accident: नाशिकमध्ये कंटेनर-कारची धडक होऊन भीषण अपघात, 5 तरुणांचा जागीच मृत्यू
Accident (PC - File Photo)

नाशिकमधील मनमाड-येवला राज्यमार्गावर भीषण अपघात घडला आहे. या राज्यमार्गावर कंटेनर आणि कारची समोरासमोर धडक होऊन हा भीषण अपघात घडला. अंकाई रेल्वे उड्डाणपुलावर झालेल्या या अपघातात 5 जण जागीच ठार झाले आहेत. रोहित धनवटे, श्रेयस धनवटे ,ललित सोनवणे, गणेश सोनवणे, प्रतीक नाईक असे अपघातात ठार झालेल्या तरुणांचे नावे आहेत. या अपघातात पाचही तरुण नाशिकचे रहिवाशी आहे. (हेही वाचा - Mumbai Rain: मुंबईत मुसळधार पावसाची हजेरी, पालघमध्येही पुन्हा एकदा अवकाळी पावसाची हजेरी)

हे पाच ही तरुण मनमाडजवळच्या कुंदलगाव येथील म्हसोबा देवस्थान येथे धार्मिक कार्यक्रम उपस्थिती लावून परतत असताना हा अपघात झाला. या अपघातात कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. मृतांचे शव मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. अवकाळी व पाऊस व रात्रीच्या अंधारामुळे मदतकार्य राबविण्यास अडथळा येत होता. रस्त्याच्या मधोमध हा अपघात झाल्याने या मार्गावरची वाहतूक संथ गतीने सुरू होती.