नाशिकच्या (Nashik) मनमाड मालेगाव (Manmad- Malegaon) रस्त्यावर एक मोठा अपघात झाला आहे. एका बस आणि ट्रॅक्टरची जोअरदार धडक झाली असून या अपघातामध्ये ट्रॅक्टर चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर बसमधील 7-8 प्रवासी जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. हा अपघात मालेगावच्या चोंढी घाट परिसरातील आहे. दरम्यान प्राप्त माहितीनुसार, मनमाड मालेगाव रोड वर चोंढी घाटाच्या पायथ्याला असणार्या एका वळणावर हा अपघात झाला आहे. बस आणि कांदे घेऊन जाणारा ट्रॅक्टर यांच्यात धडक झाली आहे. बस मनमाड कडून नंदुरबारकडे जात होती.
बसमधील 7-8 जण जखमी झाले आहेत तर ट्रॅक्टरचा चालक जागीच मृत्यूमुखी पडला आहे. तो कानडगावचा रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातानंतर सारे कांदे रस्त्यावर पसरले गेले आणि काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान घटनास्थळी पोलिस दाखल झाले आहेत. त्यांनी जखमींना तातडीने उपचारासाठी मालेगावच्या रूग्नालयात हलवले आहे. Pune Accident: अनियंत्रित रुग्णवाहिकेचा अपघात, पुण्यातीलल किवळे पुलावरील घटना .
पुण्यातही एका अपघाताची घटना समोर आली आहे. आयशर टेम्पो चालकाला डुलकी लागल्याने, समोरून येणाऱ्या मालवाहून वाहनाला त्याने जोरदार धडक दिल्याची माहिती समोर आली आहे. या धडकेत भीषण अपघात घडला असून, या अपघातात दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.