नाशिक पोलिसांनी चोरांना पकडण्यासाठी लढवली शक्कल; सराफ बाजार मधील CCTV कॅमेऱ्यात जोडण्यात आली खास सुविधा, वाचा सविस्तर
Image For Representation (Photo Credits: Facebook)

सोन्याची वाढती किंमत (Gold Rates) पाहता अनेक चोरांच्या मनसुब्यांना नवीन पालवी फुटली आहे. अशा वेळी अगोदरच तत्परता म्ह्णून नाशिक पोलिसांनी (Nashik Police) एक चांगलीच शक्कल लढवली आहे. गुन्हेगारी प्रवृत्ती आणि चोरांचे वाढते धैर्य याला वेसण घालण्यासाठी नाशिकच्या सराफ बाजार परिसरात 36 अद्ययावत सीसीटीव्ही कॅमेरे (CCTV Camera) जोडण्यात आले आहेत. हे कॅमेरे तांत्रिक दृष्ट्या अतिशय सक्षम असून यांची थेट जोडणी पोलिसांच्या कंट्रोल रूपाशी करण्यात आली आहे. यामुळेच जेव्हा कोणी संशयास्पद व्यक्ती सराफ बाजारात आढळून येईल तेव्हा पोलिसांना थेट ‘पॉप-अप’ मेसेजचा सिग्नल पाठवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येतेय. यासाठी पोलिसांकडे अगोदरच असलेला डेटा कॅमेऱ्याच्या सिस्टिमला जोडाला जाणार आहे, त्यामुळे कितीही तरबेज चोर असले तरी सीसीटीव्हीच्या नजरेत येताच पोलिसांना थेट सूचना मिळणार आहे.

मटा च्या माहितीनुसार. नाशिक सराफ असोसिएशनतर्फे ऑक्टोबर महिन्यात रविवार कारंजा ते दहिपूल परिसरात सीसीटीव्ही बसविण्याचे ठरविण्यात आले होते त्यानुसार शनिवारी 7 डिसेंबर रोजी सकाळी 36 कॅमेऱ्यांचे उद्घाटन पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. मुंबई: महाकाय गर्दीत तोतया टीसींचा रेल्वे फलाटांवर वावर; सीसीटीव्ही ठेवणार नजर

दरम्यान, या उपक्रमाविषयी पोलिस आयुक्त नांगरे-पाटील यांनी पोलिसांचे कौतुक केले आहे, सराफ बाजाराने घेतलेला निर्णय अभिमानास्पद असून, सुरक्षितता, जबाबदारी आणि पारदर्शकता राखली जाणार आहे. गुन्हे घडण्यास प्रतिबंध होणार असून, गुन्हेगार कोणत्याही परिस्थितीत आता सुटू शकणार नाही. अशीच यंत्रणा विविध ठिकाणी कार्यान्वित झाल्यास गुन्ह्यांच्या तपासाला वेग येईल, असेही नांगरे पाटील म्हणाले.