Vaishali Veer-Zankar | (File Image)

शिक्षणाधिकारी वैशाली वीर-झनकर (Vaishali Veer-Zankar) यांची रवानगी कारागृहात झाली आहे. आठ लाख रुपयांची लाच (Bribery) घेतल्याच्या प्रकरणात त्या प्रमुख संशयित आरोपी आहेत. दरम्यान, छातीत दुखत असल्याचे कारण सागत झनकर रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. मात्र, त्यांची वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर त्यांची रवानगी कारागृहात (Jail) करण्यात आली. दरम्यान, झनकर यांनी जामीनासाठी अर्ज केला आहे. त्यांच्या जामीन अर्जावर शुक्रवारी (20 ऑगस्ट) सुनावणी होणार आहे. या सुनावणीत झनकर यांचा मुक्काम कारागृहात राहणार की कारागृहाबाहेर हे ठरण्याची शक्यता आहे.

काय आहे प्रकरण?

वैशाली वीर झनकर या नाशिकच्या शिक्षणाधिकारी आहेत. एका शिक्षण संस्थेला सरकारी अनुदान मंजूर करण्यासाठी त्यांनी 8 लाख रुपयांची लाच मागितली होती. ही लाच (8 लाख रुपये) स्वीकारताना झनकर या पकडल्या गेल्या गेल्या. झनकर यांना अटक झाल्यावर न्यायालयासमोर हजर करण्यात आले. या वेळी त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, त्यांच्या छातीत दुखू लागले. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोन दिवस उपचार घेतल्यानंतर झनकर यांची रवानगी पुन्हा कारागृहात झाली. या प्रकरणात आणखी दोघा संशयितांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. चालक ज्ञानेश्वर येवले आणि प्राथमिक शिक्षक पंकज दशपुते अशी या दोघांची नावे आहेत. (हेही वाचा, NDA Exam 2021 मध्ये महिला उमेदवारांना सहभागी होण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या Interim Order जारी)

आरोप आहे की, शिक्षण संस्थेला मंजूर झालेल्या 20% अनुदानातून नियमीत वेतन देण्याच्या मोबदल्याद तबबल 9 लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. मात्र, 8 लाख रुपयांवर तडजोड झाली. एका शासकीय वाहन चालकाच्या माध्यमातून ही लाच स्वाकारली जात असताना नाशिक जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली वीर-झनकर यांना लाचलुचपत प्रतिबंध विभागाने ताब्यात घेतले. ठाणे लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने ही कारवाई केली.