नाशिकमध्ये (Nashik) आज पहाटे चिंतामणी ट्रॅव्हल्स (Chintamani Travels) या खासगी बसचा स्फोट (Nashik Bus Fire) होवून या बसला भीषण आग लागली. या दुर्घटनेत बस जळून खाक झाली असुन यांत 11 जणांचा मृत्यू झाल्याली माहिती मिळत आहे. घडलेल्या दुर्घटनेत 38 जण गंभीर जखमी झाले असुन त्यांच्यावर नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे. तरी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शोक व्यक्त केला असुन जखमी असलेले लवकरात लवकर बरे होवो अशी प्रार्थना केली आहे. तसेच पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाखांच्या मदतीची घोषणा केली असुन जखमींना 50 हजार रुपये देवू करण्यात येणार आहे. तरी खुद्द देशाचे पंतप्रधान यांनी संबंदीत दुर्घटनेची दखल घेतल्याने अपघात ग्रस्तांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच राज्य सरकराकडूनही (Maharashtra Government) मोठ्या मदतीची घोषणा करण्यात आली आहे.

 

नाशिक बस दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची मदत महाराष्ट्र शासनाच्या (Maharashtra Government) वतीने जाहीर करण्यात आली आहे तर जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केली आहे. तर  जखमींवर तातडीनं उपचार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत जखमींवर चांगले उपचार झाले पाहिजेत. उपचरात काही कमी पडू नयेत अशा सूचना दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. नाशिक बस दुर्घटनेबाबत (Nashik Bus Accident) सर्व बाबी तपासण्यात येतील तसेच या घटनेची सखोल चौकशी करण्यात येईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी सांगितले आहे. (हे ही वाचा:- Nashik Bus Fire: नाशकात खाजगी बसला भीषण आग, दुर्घटनेत 11 प्रवाशांचा मृत्यू; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत जाहीर)

 

राज्याचे उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadvais) यांनी ट्वीट करत सर्व जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार केले जात असल्याची माहिती दिली आहे. घडलेल्या दुर्घटनेबाबत देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच नाशिकमध्ये खाजगी बस आणि टँकर अपघाताची घटना अतिशय दुःखद आहे. या घटनेत मृत्यू झालेल्यांच्या आप्तजनांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलिस आयुक्त आणि स्थानिक अधिकारी हे स्वतः घटनास्थळी असून मदत कार्यावर लक्ष ठेवून आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.