नाशकातून (Nashik) एक धक्कादायक माहिती पूढे येत आहे. पहाटेच्या साखर झोपेत असातानाचं प्रवाशांवर काळाचा घाला घातला आहे. नाशकात पहाटेच्या सुमारास एका खासगी बसचा स्फोट (Nashik Bus Fire) होवून या बसला भीषण आग लागली असुन बस जळून खाक झाली आहे. तरी या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाल्याली माहिती मिळत आहे. यात 10 प्रौढ तर एका चिमुकल्याचा समावेश आहे. घडलेल्या दुर्घटनेत अनेक जण गंभीर जखमी झाले असुन त्यांच्यावर नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे. दुर्घटनेची गंभीरता बघता जिल्हाधिकारी गंगाठरन डी यांनी खुद्द नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल होवून अपघात ग्रस्तांची पहाणी केली आहे. नाशिक शहरातील औरंगाबाद रोडवरील हॉटेल मिरची चौकात असलेल्या चौफुलीवर ही भीषण घटना घडली आहे. अपघात झालेली ही खासगी बस ही चिंतामणी ट्रॅव्हलची (Chintamani Travels) ही मुंबईकडून यवतमाळच्या दिशेने निघालेली बस होती.
या घटनेसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दुख व्यक्त केला. या घटनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी गंगाठरन डी (Gangatharan D) याच्याशी संवाद साधला आहे. या घटनेत 11 जणांचा मृत्यू तर 38 जण जखमी झाल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. तर जखमींवर तातडीनं उपचार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत जखमींवर चांगले उपचार झाले पाहिजेत. उपचरात काही कमी पडू नयेत अशा सूचना दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तसेच अपघातातील मृतांच्या मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारनं पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
Maharashtra | At least 8 people dead after a bus caught fire in Nashik last night. Bodies & injured people have been taken to hospital, we're still trying to ascertain the exact number of deaths with doctor's confirmation: Nashik Police— ANI (@ANI) October 8, 2022
या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची मदत शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे. तसेच जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्यात येत आहेत.— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) October 8, 2022
नाशिक बस दुर्घटनेबाबत सर्व बाबी तपासण्यात येतील तसेच या घटनेची सखोल चौकशी करण्यात येईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. चिंतामणी ट्रव्हल्स एक ट्रकला धडकल्यामुळं हा स्फोट झाल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. जखमींवरचा उपचाराचा खर्च शासनाकडून करण्यात येणार आहे. तरी घडलेल्या प्रकाराची सखोल चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.