पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी काल, 2 मार्च रोजी अचानक केलेल्या एक ट्विट नंतर सोशल मीडियात चर्चाना उधाण आले आहे, खरंतर मोदींचे हे ट्विट सुद्धा सोशल मीडियाशी संबंधितच आहे, आपण आता फेसबुक, ट्विटर, इन्स्ट्राग्राम अशा सर्व समाज माध्यमातून दूर जाण्याचा विचार करत आहे याबाबत रविवारी मी निर्णय घेणार आहे अशा आशयाचे मोदींचे कालचे ट्विट होते, अन्यथा सोशल मीडियावर सर्वात जास्त ऍक्टिव्ह असण्याच्या ज्यांच्या चर्चा असतात, इतकेच नव्हे तर जगभरात सर्वात जास्त फॉलो केल्या जाणाऱ्या नेत्यांमध्ये ज्यांचे नाव आहे त्या मोदींनीच अशा प्रकारची घोषणा केल्याने त्यांच्या चाहत्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे, असं असलं तरी दुसरीकडे, नरेंद्र मोदी यांचा हा निर्णय स्वागतार्ह्य आहे त्यामुळे देशात शांती बनून राहिऊल अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र कॅबिनेट मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्याकडून समोर येत आहे, तर राष्ट्रवादीचे मोठे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी सुद्धा मोदींंच्या या ट्विट वरून टोलेबाजी करण्याची संधी हेरली आहे.
काय म्हणाले नवाब मलिक?
नरेंद्र मोदी यांनी काल सोशल मीडिया सोडण्याचा निर्णय घेताच अनेक भाजप नेत्यांनी सुद्धा त्यांच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा इशारा दिला मी तर म्हणतो त्यांच्या सोबतच आता मोदी भक्तांनी सुद्धा सोशल मीडिया सोडावा, यामुळेच देशात शांती निर्माण होईल आणि त्यांच्या या निर्णयाचे स्वागतच आहे त्यांनी रविवारी खरोखरच सोशल मीडिया सोडून द्यावे.
नवाब मलिक ट्विट
कल मोदी जी ने सोशल मीडिया रविवार से छोड़ने के संकेत दिए हैं कुछ नेता भी छोड़ने की बात कर रहे हैं अगर सारे भक्तों ने छोड़ दिया तो देश शांत हो जाए गा,
मोदी जी का फैसला देश हित में होगा हम स्वागत करते हैं मोदी जी फैसला लें। #ModiQuitsSocialMedia
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) March 3, 2020
जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया
नरेंद्र मोदी यांनी सोशल मिडिया बंद करायला आठ दिवसांचा वेळ घेतलाय पण नोटबंदी मात्र क्षणात केली होती. म्हणजेच न विचार करता घेतलेले निर्णय किती घातक असतात याची कल्पना आल्यामुळे त्यांनी आठ दिवसांचा वेळ घेतला असेल का? असा सवाल आव्हाड यांनी आपल्या ट्विट मधून मांडला आहे.
जितेंद्र आव्हाड ट्विट
सोशल मिडिया बंद करायला आठ दिवसांचा वेळ घेतलाय पण नोटबंदी मात्र क्षणात केली होती.
म्हणजेच न विचार करता घेतलेले निर्णय किती घातक असतात याची कल्पना आल्यामुळे त्यांनी आठ दिवसांचा वेळ घेतला असेल का??
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) March 3, 2020
दरम्यान, नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया सोडणार असल्याचा इशारा देताच त्यांना काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांना उत्तर देत तुम्ही द्वेष सोडा, सोशल मीडिया नाही असा सल्ला दिला होता तर, महाराष्ट्राच्या माजी मिसेस मुख्यमंत्री अमृता फडणवीस यांनी मोदींच्या पाठोपाठ आपण सुद्धा सोशल मीडिया सोडडणार असल्याचा इशारा दिला होता.