स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे मातृभूमीबद्दलचे प्रेम, मराठी भाषा आणि लिपी शुद्धीकरणाच्या कार्यामध्ये मोलाचं योगदान आहे. विनायक दामोदर सावरकर (Vinayak Damodar Savarkar) हे प्रखर राष्ट्रवादी होते. त्यांनी आपल्या लेखणी, विचारांच्या माध्यमातून समजातील अनिष्ट प्रथांवर टीका केली. विज्ञानाचा पुरस्कार करणार्या सावरकरांनी जातीभेदाचाही धिक्कार केला. आज त्यांच्या 136 व्या जयंती निमित्त अनेक मान्यवरांनी आदरांजली ट्विटरच्या माध्यामातून व्यक्त केली आहे. विनायक दामोदर सावरकर यांचे देशभक्तीचा दाखला देणारे 5 प्रेरणादायी विचार
नरेंद्र मोदी
We bow to Veer Savarkar on his Jayanti.
Veer Savarkar epitomises courage, patriotism and unflinching commitment to a strong India.
He inspired many people to devote themselves towards nation building. pic.twitter.com/k1rmFHz250
— Narendra Modi (@narendramodi) May 28, 2019
राज ठाकरे
क्रांतिवीरांचे सेनापती, हिंदू संघटक, समाजसुधारक, साहित्यिक, विज्ञाननिष्ठा व राष्ट्राची शस्त्रसज्जता ह्या विषयी ठोस विचारमांडणी करणारे, प्रखर राष्ट्राभिमानी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ह्यांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन.#VeerSavarkar pic.twitter.com/innCdcawwK
— Raj Thackeray (@RajThackeray) May 28, 2019
पंकजा मुंडे
जाज्वल्य देशभक्ती, मुर्तिमंत साहस, विज्ञाननिष्ठ विचारांच अधिष्ठान, ओजस्वी व प्रतिभावंत कवि अशा अष्टपैलू व्यक्तिमत्व असणाऱ्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंती निमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन !! pic.twitter.com/XNEBk1BBKO
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) May 28, 2019
विनोद तावडे
Let us pay our heartfelt respects Swatantry #VeerSavarkar, whose hard work and dedication uniquely shaped Indian Nationalism on the Freedom path. On this day, let us try and imbibe his values of rationalism, humanism and pragmatism for the betterment of our Nation. pic.twitter.com/wWoiDragCS
— Vinod Tawde (@TawdeVinod) May 28, 2019
सावरकरांचे प्रेरणादायी विचार
27 मे 1883 दिवशी विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म झाला होता. त्यांनी भारतामधून ब्रिटीशांची सत्ता उलथून टाकण्यासाठी काळ्या पाण्याची शिक्षा भोगली होती.