Narayan Rane On Maha Vikas Aghadi: भाजप नेते नारायण राणे यांनी नुकतीच शिवसेनेवर व महाआघाडीच्या सरकारवर कठोर शब्दात टीका केली आहे. राज्यातील शिवसेनेच्या 56 आमदारांपैकी 35 आमदार आपल्या पक्ष नेतृत्वावर असमाधानी आहेत, असा दावा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केला आहे.
भाजपच्या कोट्यातून राज्यसभेचे खासदार असलेले नारायण राणे, हे शनिवारी रात्री एका कार्यक्रमात पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला “निकामी” म्हणाले. तसेच राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसला पाच आठवड्यांपेक्षा जास्त कालावधी लागल्याने त्यांच्यावर टीका केली आहे.
तसेच महाराष्ट्रात भाजपा पुन्हा सत्तेत येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भाजपकडे 105 आमदार आहेत आणि शिवसेनेचे केवळ 56 आहेत. त्यातीलही 35 आमदार हे असमाधानी आहेत, असा दावा राणे यांनी केला.
ठाकरे सरकारने शेतकर्यांच्या कर्जमाफीचे आश्वासन हे “पोकळ” आहे, कारण ते कधी अंमलात आणले जाईल याबाबत कोणतेही वेळापत्रक दिलेले नाही, असेही म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला.
इतकंच नव्हे तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या औरंगाबाद दौर्याचा संदर्भ देत असताना राणे म्हणाले की ते कोणत्याही योजनेची घोषणा केल्याशिवाय व प्रदेशाला कोणताही निधी न देता परत आले आहेत.
आधी अजित पवारांवर कारवाई करा, विजयसिंह मोहिते पाटील यांची मागणी
"अशा सरकारकडून आपण काय अपेक्षा करू शकतो? सरकार चालवण्याबद्दल त्यांना काहीच माहिती नाही. सरकार स्थापण्यासाठी त्यांना पाच आठवड्यांचा कालावधी लागला, यातून ते शो कसा चालवतील याची कल्पना आपण करू शकतो," असं राणे म्हणाले.