Nanded Shocker: मुलीचा लव्ह मॅरेजचा अट्टहास,बापाने रागाच्या भरात मुलीचा केला खून; नांदेड घटनेमुळे राज्य हादरलं
Crime Image File

Nanded Shocker: महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यात ऑनर्र किलींगच्या(Honour Killing ) घटनेमुळे संपुर्ण राज्य हादरला आहे. मुलीने वडिलांच्या इच्छे विरुध्द लग्नाचा हट्ट धरला त्यामुळे  वडिलांनी रागाच्या भरात मुलीची हत्या केली आहे. तीचा मृतदेह शेतात जाळून टाकला. जिल्ह्यातील मनु तांडा येथे घडली. आठ दिवसांपुर्वी ही घटना घडली. पोलीसांनी आरोपीला अटक केली आहे. धारधार शस्त्राने तिच्यावर वार करत तीला मारून टाकलं. मृत तरुणीच्या आईने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. तिच्यावर घरी कोणी नसताना वार केला. आणि तीला मारून टाकलं.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुणी ही 16 वर्षांची होती. राजुरा तांडा येथील नातेवाईक असलेल्या एका मुलाशी प्रेम संबंध होते. वडिलांना त्याच्या प्रेम संबंधी विषयी सांगितले. मात्र, त्यांच्या लग्नाला तिच्या वडिलांचा विरोध होता. मात्र, तिने त्यांच्या कडे त्याच मुलासोबत लग्न करण्याचा अट्टहास धरला. या संबंधी वडिलांना राग अनावर झाल्याने मुलीला घरी कोयत्याने सपासप वार केला. दरम्यान तिचा जागीच मृत्यू झाला. हा सर्व प्रकार आई समोर घडला. या घटनेची उघडणी केलीस तर तीला ही मारून टाकण्याची धमकी दिली.मुलीचा मृतदेह शेतात जाऊन जाळून टाकला. दरम्यान शेजारच्यांनी विचारल्यावर मुलीने आत्महत्या केल्याचे सांगितले.

मुलीच्या मृत्यूची खबर गावात पसरली. गावातील पोलीसांत देखील ही बातमी पसरली. त्यामुळे पोलीसांनी गुप्तपणे या गोष्टी बाहेर काढायचे ठरवले. आईला ताब्यात घेत चौकशी सुरु केली तेव्हा हा संपुर्ण प्रकार उघडकीस आला. पोलीसांनी शोधाशोध घेत आरोपी बापाला ताब्यात घेतले. त्याला अटक केले.