नांदेड: महिलेसोबत अनैतिक संबध ठेवणे एका तरुणाला पडले महागात
crime I mage only representative purpose (Photo credit: pxhere)

महिलेसोबत अनैतिक संबध ठेवल्यामुळे एका 33 वर्षीय तरुणाला आपला जीव गमावावा लागला आहे. ही घटना नांदेड (Nanded) जिल्ह्यातील कंधार (kandhar) तालुक्यात घडली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. मृत तरुणाचे गावातील एका तरुणीशी अनैतिक संबध होते. याची माहिती महिलेच्या भावांना कळाली. यातून त्यांनी संबधित तरुणाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली. पोलिसांनी अगोदर मृत्यूचीनंतर खुनाचा गुन्हा दाखल करत तिघांना न्यायालयात हजर केले. त्यावेळी त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

बळीराम संभाजी शिंदे असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील मंगनाळी गावात तो राहत होता. तसेच या गावात राहणाऱ्या एका महिलेशी त्याचे अनैतिक संबंध जुळले. यामुळे बळीराम हा संबधित महिलेच्या घरी कोण नसल्यावर जात असे. याची माहिती महिलेच्या भावांना कळाली. यातून त्यांनी बळीरामचा काटा काढण्याचा कट रचला. रविवारी बळीराम घरी आला. त्यावेळी त्याची बहीण घरात होती. त्याने घरात बॅग ठेवून शौचालयाला जाण्यासाठी घराबाहेर पडला. परंतु, तो घरी परतलाच नाही. यामुळे घरच्यांनी त्यांचा शोध घ्यायला सुरुवात केली. मात्र, गुरुवारी सकाळी 8 च्या सुमारास बळीराम याचा मृतदेह गावापासून 12 किलोमीटरवरील एका शेतात सापडला. याप्रकरणी पोलिसांनी चौकशी करायला सुरुवात केली तर, बळीराम याचा खून झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. ज्या महिलेसोबत बळीरामचे अनैतिक संबंध होते. तिच्या भावांनीच बळीरामची हत्या केल्याचे उघडकीस आले. हे देखील वाचा- पुणे: सावत्र वडीलांकडून 15 वर्षीय तरूणीवर लैंगिक अत्याचारानंतर निर्घुण हत्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत बळीराम शिंदे यांचा खून केल्याप्रकरणी मारोती अभंगे, मन्मथ रामा अभंगे, लक्ष्मीबाई अभंगे या ३ आरोपींना पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनवण्यात आली आहे.