Representational Image (Photo Credits: Facebook)

निर्भया सामुहिक बलात्कार, हैदराबाद डॉक्टर तरुणीचा बलात्कार आणि हत्या त्यानंतर आता पुण्याच्या भोसरी परिसरामध्ये 15 वर्षीय तरूणीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घुण हत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.या प्रकरणातील आरोपी हा पीडित तरूणीचे सावत्र वडील असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या या प्रकरणी पोलिस स्थानकामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला असून अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. पोलिसांनी POCSO सोबतच इतर कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे. संतापजनक! औरंगाबाद येथे 20 वर्षीय मुलाकडून आईवर वारंवार बलात्कार; तीन महिने चालला होता लैंगिक अत्याचार.

पीडितेचा मृतदेह तिच्या बहीणीला पिंपरी चिंचवड येथील दापोडी या तिच्या राहत्या घरी संध्याकाळी सापडला. तरूणीच्या आईने पोलिसांमध्ये तक्रार करताना त्या दोघांमध्ये गुरूवार (12 डिसेंबर) वाद झाल्याची माहिती दिली आहे. पीडितेच्या आईलादेखील जीवेमारण्याची धमकी दिल्याचं तक्ररीमध्ये सांगितलं आहे.

ANI Tweet  

गुरूवारी संध्याकाळी जेव्हा पीडीतेची बहीण घरी आली तेव्हा दार कुणीच उघडत नसल्याने तो तोडल्यानंतर तिला बहिणीचा मृतदेह दिसला. त्यानंतर तिने आईला याची माहिती दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीमध्ये फरार आरोपी हा रिक्षाचालक आहे. हत्येनंतर तो फरार झाला असून पिंपरी चिंचवड पोलिसांकडून त्याचा तपास सुरू आहे.